लोकप्रिय टेनिसपटू रॉजर फेडरर याने निवृत्ती जाहीर केली आणि सोशल मीडियावर सगळेच भावुक झाले. सामान्य माणसापासून मोठमोठ्या सेलिब्रिटीनी फेडररविषयी त्यांचं प्रेम व्यक्त केलं. अनुष्का शर्मापासून सचिन तेंडुलकरपर्यंत कित्येकांनी रॉजरला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. परंतु दिग्दर्शक हंसल मेहता यांनी मात्र एक ट्वीट करून बऱ्याच प्रश्नांना आणि चर्चेला तोंड फोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्कॅम १९९२ वेबसीरिजचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी चक्क अभिनेता अरबाज खानचा फोटो शेअर करत टेनिसपटू रॉजर फेडररला निरोप दिला आहे. हंसल यांनी अरबाजचा फोटो पोस्ट केला आणि लिहिलं की, “तुझी कमतरता कायम जाणवेल चॅम्पियन. #रॉजरफेडरर.” हंसल यांच्या या ट्वीटमुळे सोशल मीडियावर लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही लोकांनी हंसल यांना मूर्खात काढलं आणि तर काही लोकांनी हंसल यांच्या विनोदबुद्धीला दाद देत त्यांचं हे ट्वीट शेअर केलं आहे. काही लोकांनी या ट्वीटवरून अरबाज खानला ट्रोल केलं आहे. एकूणच अरबाज आणि रॉजर यांच्या चेहऱ्यात बरंच साम्य असल्याने लोकांचा हा गोंधळ उडत आहे. हंसल यांनी हे ट्वीट सहज विनोद म्हणून शेअर केलं असलं तरी बऱ्याच लोकांना तो विनोद न समजल्याने गोंधळ झाला आहे.

आणखी वाचा : Photos : ‘लाल सिंह चड्ढा’ ते ‘ब्रह्मास्त्र’ आणि आता ‘थँक गॉड’ : २०२२ मधल्या या चित्रपटांवर भारी पडला बॉयकॉट ट्रेंड

रॉजरच्या निवृत्तीनंतर हंसल यांनी ट्वीट करत त्यांचं मनोगत व्यक्त केलं होतं. हंसल म्हणाले “आता टेनिस हे कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. टेनिस कोर्टवर आणि कोर्टच्या बाहेर तू दाखवलेल्या खिलाडू वृत्तीसाठी, हुशारीसाठी टेनिस मास्टर रॉजर फेडरर तुझे मनःपूर्वक आभार. तू सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेस.”

२३-२५ सप्टेंबरच्या दरम्यानच्या शेवटच्या सामन्यात रॉजर शेवटचा खेळताना दिसेल. त्याच्या या सामन्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. काल रॉजरने निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर मनोरंजनसृष्टीतल्या कित्येकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अनुपम खेर, लारा दत्ता, करीना कपूर, अनुष्का शर्मा अशा कित्येक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे आणि रॉजर फेडररला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या.