कंगना राणावत, अमिताभ बच्चन मानकरी; ‘बाहुबली’ सवरेत्कृष्ट चित्रपट, रिंगण उत्कृष्ट मराठी चित्रपट
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यात ‘पिकू’ चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. लागोपाठ दुसऱ्यांदा कंगना राणावत हिने सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. रिंगण हा सवरेत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. बहुभाषिक चित्रपटात ‘बाहुबली’ला गौरवण्यात आले आहे, तो पुरस्कार वगळता इतर प्रवर्गात बॉलीवूडचे वर्चस्व राहिले. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटातील भूमिकेसाठी रिंकू राजगुरू हिला ज्युरींचा विशेष पुरस्कार मिळाला असून ‘कटय़ार काळजात घुसली’ चित्रपटातील गाण्यासाठी पाश्र्वगायक महेश काळे यांना गौरवण्यात आले.
‘पिकू’ या कौटुंबिक नाटय़ावर आधारित चित्रपटात रोगभ्रमित वडिलांची भूमिका साकारणाऱ्या बच्चन (७३) यांना चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. कंगना राणावत (२९) हिला ‘तनू वेडस मनू रिटर्न्स’ चित्रपटातील दुहेरी भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे. कंगना म्हणाली की, अमिताभ यांच्यासारख्या अभिनेत्याबरोबर हा सन्मान होत असल्याचा वेगळा आनंद आहे. कंगनाचा हा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे. ‘क्वीन’ या चित्रपटासाठी तिला गेल्या वर्षी सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. यापूर्वी २००८ मध्ये फॅशन चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. एस. एस. राजामौळी यांच्या ‘बाहुबली’ या बिगबजेट चित्रपटास सवरेत्कृष्ट फीचर फिल्म गटातील पुरस्कार मिळाला. संजय लीला भन्साळी यांना ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला असून या चित्रपटास इतर पाच सन्मानही मिळाले आहेत. ‘दम लगा के हैशा’ चित्रपटाला उत्कृष्ट हिंदूी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. सलमान खान याच्या ‘बजरंगी भाईजान’ने लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. ‘तलवार’ चित्रपटास उत्कृष्ट रूपांतरित पटकथेचा तर ‘पिकू’ व ‘तनू वेडस मनू रिटर्न्स’ या चित्रपटांना उत्कृष्ट मूळ चित्रपटकथेचा पुरस्कार मिळाला. नानक शाह ‘फकीर’ या चित्रपटाला नर्गीस दत्त पुरस्कार मिळाला असून राष्ट्रीय एकात्मतेवरील उत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून या चित्रपटाची निवड झाली. उत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कारही या चित्रपटास मिळाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा