बॉलिवूडमध्ये असहिष्णुता अजिबात नाही, असे सांगून अभिनेत्री काजोल हिने असहिष्णुतेचा मुद्दा निकाली काढला. चित्रपट निर्माते करण जोहर यांनी काल जयपूर साहित्य महोत्सवात पुन्हा असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करताना देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाही नसल्याचा खळबळजनक आरोप करताना मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य केले होते.
काजोल यांनी सांगितले, समाजात जे घडते आहे त्याचे प्रतिबिंब बॉलिवूडमध्ये उमटते, ते तसे चालू राहील. बॉलिवूडमध्ये सर्वाचेच स्वागत आहे, त्यात कुठला दुजाभाव नाही व असहिष्णुताही नाही. करण जोहर व काजोल यांची चांगली मैत्री आहे, त्या पाश्र्वभूमीवर दोघांची विधाने महत्त्वाची आहेत. यापूर्वी शाहरूख खान व आमीर खान यांनीही देशात असहिष्णुता असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
काजोल यांनी सांगितले की, आजच्या काळात लोक जास्त संवेदनशील बनले आहेत. सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून आम्ही बरोबर बोलले पाहिजे, मी नेहमीच मन की बात सांगत आले आहे व आताही काही वेगळे सांगितलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा