srk-450
जगात सध्या ३डी प्रिंटचे वारे वाहात आहेत. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या रेडचिलीज् व्हिएफएक्स कंपनीने शाहरूखच्या नेहमीच्या खास रोमॅन्टिक शैलीतील ३डी प्रिंट शाहरूखला भेट देऊन त्याला सुखद आश्चर्याचा धक्का दिला. रेडचिली कंपनीने ऑटोडेस्क इंडियाच्या सहयोगाने शाहरूख खानला त्याच्या खास रोमॅन्टिक शैलीतील हा चंदेरी रंगाचा पूर्णाकृती पुतळा ३डी प्रिंटरद्वारे प्रिंट करून दिला. एखाद्या व्यक्तीची ३डी प्रिंट काढण्याचा हा उपक्रम जगात पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे. स्वत:ची ३डी प्रिंट पाहून शाहरूखला भावना अनावर झाल्या. यावेळी बोलताना तो म्हणाला, एखाद्या व्यक्तीचे पूर्णाकृती ३डी प्रिंट कढण्याचा अनोखा उपक्रम रेडचिली व्हिएफएक्स आणि ऑटोडेस्कने पहिल्यांदाच राबविला आहे. तंत्रज्ञानाने केलेली प्रगती अचंबित करणारी आहे. तंत्रज्ञानाच्या या अदभूत क्षेत्राचा एक भाग असल्याचा मला आनंद आहे. माझ्या खास रोमॅन्टिक शैलीतील काढण्यात आलेले चंदेरी रंगातली माझी ही ३डी प्रिंट अचंबित करणारी असून, कधी एकदा ते माझ्या मुलांना दाखवतो, असे मला झाले आहे. शाहरूखने केतन, पॅरी, रेडचिली व्हिएफएक्सचे कर्मचारी आणि ऑटोडेस्कच्या कर्मचाऱ्यांचे त्यांच्या या अनोख्या कार्यासाठी आभार मानले.

Story img Loader