काही सूर हे लोकांच्या काळजाचा ठाव घेतात. पुन्हा तो आवाज कधी ऐकायला मिळेल, त्याच्या आवाजात नवं काही ऐकायला मिळेल, अशी उत्सुकता अनेकांच्या मनात असते. लता दीदी, किशोर कुमार, मोहम्मद रफी यासारख्या दिग्गज गायकांचा आवाज आजही लोक ऐकतात. असाच गायक म्हणजे केके, पार्श्वगायक म्हणून बॉलिवूडमध्ये पाचशेहून अधिक गाणी गाणाऱ्या केके ऊर्फ कृष्णकुमार कुन्नथ याचा आवाज कोणत्याही एका कलाकाराशी जोडला गेला नाही.

गायक केकेच काही महिन्यांपूर्वी निधन झाले, बॉलिवूडला आणि त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. त्याच्या जाण्याने संगीतक्षेत्रात शोककळा पसरली. केकेचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते आहेत. केकेच्या आवाजाची जादू तरुणाईवर जास्त होती. केके मात्र एका गायकाच्या आवाजाचा चाहता होता, तो गायक कोण तर जाणून घेऊयात..

‘केके’च्या मुलीचं चाहत्यांना भावनिक आवाहन, म्हणाली “माझ्या बाबांच्या टीमविरोधात…”

सत्तर ऐंशीच्या दशकात ज्या गायकाच्या आवाजाची जादू होती तो आवाज म्हणजे ‘किशोर कुमार’. किशोर कुमार यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. केवळ हिंदीतच नव्हे तर इतर भाषेत देखील त्यांनी गाणी गायली आहेत. केकेने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलखतातीत सांगितले होते की, किशोर कुमार यांच्या गाण्याचा आणि आवाजाचा त्याच्यावर प्रभाव होता. त्याने पुढे सांगितले की त्याने संगीताचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही.

केके मूळचा दिल्लीचा, संगीत क्षेत्रात येण्याआधी तो हॉटेल उद्योगात काम करत होता. संगीतातात करियर करण्यासाठी त्याने मुंबई गाठली. पहिले गाणे मिळण्याआधी त्याने जवळपास ३५००० वर जिंगल्स गायल्या होत्या. त्याच्या कारकिर्दीत त्याच्या बायकोचा मोठा वाटा होता, असेही त्याने सांगितले होते.

Story img Loader