‘आईसारखे दैवत सार्या जगतावर नाही’, असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही. आई आहे म्हणून प्रत्येकाच्या घराला घरपण आहे. सतत घरातल्यांसाठी, मुलांसाठी राबणारी आई एकही दिवस सुट्टी न घेतला ३६५ दिवस काम करत असते. कधी दुखलंखुपलं तरीदेखील कोणाला न सांगता ते सहन करते. अशाच आईचा सन्मान करणारा,तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मदर्स डे साजरा केला जातो. त्यामुळे हा दिवस प्रत्येक मुलासाठी, मुलीसाठी खास असतो. यामध्येच काही बॉलिवूड कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आईला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता विकी कौशलने इन्स्टाग्रामवर त्याच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या आईसोबत समुद्र किनारी मस्ती करताना दिसत आहे. आज सुद्धा मी असाच पळत असतो, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या लहानपणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अनन्याचे वडील अभिनेता चंकी पांडे तिला विचारतात की जगात तू सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करते, तर त्यावर ती पटकन आईचं नाव घेते.
सोशल मीडियावर बिनधास्तपणे व्यक्त होणारी अभिनेत्री ट्विंकल खन्नाने एक मोनोलॉग शेअर केला असून यात एका आईला मुलांकडून काही अपेक्षा असतात पण ती सांगू शकत नाही. यावेळी तिची नेमकी अवस्था काय असते हे ट्विंकलने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सारा अली खानने आई अमृता सिंग आणि आजीचा एक फोटो शेअर केला आहे.
अमिताभ बच्चन यांनीही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन एक छान संदेश दिला आहे.
तसंच अभिनेत्री कंगना रणौतने आईसाठी एक कविता लिहिली आहे.
दरम्यान, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अर्जुन रामपाल, सोनम कपूर,अर्पिता खान या कलाकारांसोबत अन्य अनेक सेलिब्रिटींनी या दिवशी आपल्या आईला विशेष शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहे.