चित्रपटांच्या चित्रिकरणाकरिता बॉलीवूडसाठी गोवा पसंतीचे ठिकाण बनत चालले आहे. यावर्षी ऑगस्टपर्यंत गोव्यात १०० पेक्षाही जास्त चित्रपटाचे चित्रिकरण झाले असून गेल्या दोन वर्षांमध्ये केवळ ८० चित्रपटांचे चित्रिकरण येथे करण्यात आले होते. यावरुन दिग्दर्शक चित्रिकरणाकरिता गोव्यास महत्व देत असल्याचे स्पष्ट होते.
मोहित सुरीचा यशस्वी चित्रपट ‘आशिकी-२’ सह आगामी चित्रपट ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटांची काही दृश्ये येथे चित्रित करण्यात आली आहेत. विक्रम भट्टच्या ‘हेट स्टोरी-२’ चेही गोव्यात विविध लोकेशनवर चित्रिकरण करण्यात आले असून ‘गो गोवा गोन’चेही येथेच चित्रिकरण करण्यात आले होते. २०११ साली रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ आणि मनीष शर्माच्या ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’चे चित्रिकरण येथे झाले होते. राज्य सरकारची संस्था एंन्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवाच्या रेकॉर्डनुसार मालिका आणि रिअॅलिटी शो सुद्धा चित्रिकरणाकरिता गोव्याकडे वळत असल्याचे कळते.
गेल्या तीन वर्षांमध्ये मराठी, कोंकणी चित्रपटांसह सीआयडीसारख्या मालिका आणि रिअॅलिटी शोचे येथे चित्रिकरण करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा