शकुन बत्रा दिग्दर्शित ‘गहराइयां’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रत्येक चित्रपटाच्या शेवटी जशी एक क्रेडिट प्लेट येते. त्याच प्रमाणे या चित्रपटाच्या शेवटी एक क्रेडिट प्लेट दिसत असून त्यात इंटिमेट दिग्दर्शकाचे देखील नाव दाखवण्यात आले आहे. यामुळे आता इंटिमेट सीन दिग्दर्शकावर चर्चा सुरु झाली आहे.
असीम छाबरा यांनी ट्वीट करत सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. असीम हे एक उत्तम लेखक आहेत. त्यांनी इरफान, शशी कपूर, प्रियांका चोप्रा सारख्या अनेक सेलिब्रिटींची बायोग्राफी लिहिली आहे. यावेळी असीम यांनी ट्वीट करत चित्रपटाची क्रेडिट प्लेट शेअर केली आहे. ही प्लेट शेअर करत असीम म्हणाले, “मी चुकीचा असू शकतो, पण मी भारतीय चित्रपटात (किंवा इतर कोणत्याही चित्रपटात) ‘इंटिमसी डायरेक्टर’ साठी क्रेडिट देताना पाहिलं आहे? मी दार गाईला ओळखतो आणि या चित्रपटातील त्यांचे काम पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”
कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेत, न्युड किंवा सेक्सच्या सीनचं शूटिंग कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करणं याची जबाबदारी ही इंटीमेट दिग्दर्शकाची असते. त्यांच एवढंच काम नाही तर इंडियाच्या दिग्दर्शकांवर खूप मोठी जबाबदारी असते. भारतात दिग्दर्शकाला हे पहाव लागतं की अभिनेता आणि अभिनेत्री त्या सीनसाठी कम्फर्टेबल आहेत. चित्रीकरण करत असताना कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार नाही. त्यासोबत त्यांना दोन्ही कलाकारांच्या वजनाचा विचार करावा लागतो.
आणखी वाचा : ‘ऊ अंतावा’ गाण्याला कंटाळलेल्या नेटकऱ्याचा व्हिडीओ शेअर करत समांथा म्हणाली…
जर अभिनेत्री एखादा सेक्स सीन करण्यास लाजत असेल किंवा तिला भीती वाटत असेल, तर इंटिमेट दिग्दर्शक तिची समजूत काढतात. इंटीमेट दिग्दर्शक त्या सीनसाठी कलाकार कोणते कपडे परिधान करणार हे देखील ठरवतात. त्यासोबत कोणत्याही अभिनेत्रीसोबत सेटवर काही होणार नाही याची काळजी घेण्याच काम ते करतात.
आणखी वाचा : “उद्धवदादा तुम्ही बाळासाहेबांचे…”, वाइन विक्रीवरून बिचुकलेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
चित्रपटाच्या सुरुवातीलाच ठरवण्यात येतं की कोणता इंटीमेट दिग्दर्शक सीनचे चित्रीकरण करणार. इंटीमेट दिग्दर्शकाचे काम फक्त टेक्निकल नाही तर मानसशास्त्राशी संबंधीतही असते. कोणताही अभिनेता कोणत्याही सेक्स किंवा किसिंग सीन दरम्यान एक्सायटेड झाला तर त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने पाहिले जात नाही.
दरम्यान, ‘गहराइयां’ या चित्रपटात दीपिका पदुकोण, सिद्धार्थ चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ११ फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.