भारताच्या नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं. नीरजच्या या यशानंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. नीरजच्या या कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच नीरजचं कौतुक केलंय.
सिने निर्माते अशोक पंडित यांनी देखील नीरजला सोशल मीडियावरून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरल्यानंतर शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देत असतानाच अशोक पंडिंत यांनी राजकीय संबध जोडल्याने त्यांना आता या शुभेच्छा देणं चांगलंचं महागात पडलं आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ हे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार’ असं केलं होतं. याचा संदर्भ जोडत अशोक पंडित यांनी नीरजला शुभेच्छा दिल्या. ट्विटरवर नीरजचा एक फोटो त्यांनी शेअर केलाय. तर पोस्टमध्ये “राजीव गांधी यांचं नाव हटवताच सुवर्णपदक मिळालं” असं ते म्हणाले आहेत. अशोक पंडित यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
राजीव गांधी का नाम हटाते ही गोल्ड़ आ गया #Panauti pic.twitter.com/e78hgKjJ36
— Ashoke Pandit (@ashokepandit) August 7, 2021
हे देखील वाचा: महाराष्ट्रातील शाळांमधून खेळाडू घडवा; नीरजच्या यशानंतर मराठी अभिनेत्याची इच्छा
अशोक पंडित यांच्या ट्वीटवर एक युजर म्हणाला, “तुमचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. तुम्हाला उपचाराची गरज आहे. काँग्रेसने बनवलेल्या एखाद्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्या.”
भाई आपका दिमागी संतुलन बिगड़ चुका है अच्छे इलाज की जरूरत है कांग्रेस के बनाए अस्पताल में जाकर अपना अच्छा इलाज करवा लो नहीं तो दुनिया आपको ” निकम्मा और मूर्ख ” से ज्यादा और कुछ नहीं समझेगी।
— Ganesh Ghogra (@GaneshGINC) August 8, 2021
तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “मोदीजी कोणते क्रिकेटर आहेत जे त्यांच्या नावावर स्टेडियम आहे. सरकरा बदलल्यानंतर तुम्ही देखील बदलाल.”
मोदी जी कोनसा क्रिकेटर है जो उनके नाम पर स्टेडियम है।
आप अपने काम पर हो चाटना बुरी बात है।
तुम सरकार बदलते ही तुम भी बदल जाओगे।— प्रकाश चन्द धानका (@Prakashchanddh5) August 8, 2021
हे देखील वाचा: आईचे ‘ते’ शब्द ऐकून करण जोहरला अश्रू अनावर झाले
तर एकजण म्हणाला, “राजीव गांधी यांचं नाव असतानाच अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकलं होतं”
Abhinav Bindra ne bhi rajive Gandhi ke naam k samay gold jeeta tha
— Thakur Rajat singh chauhan (@itsrajatksingh) August 7, 2021
तर अनेक नेटकऱ्यांनी नीरज चोप्राच्या विजयाचा राजकारणाशी संबध जोडल्याने निर्माते अशोक पंडित यांच्यावर निशाणा साधत त्यांना ट्रोल केलंय.
बॉलिवूडमधील बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह अक्षय कुमार, अजय देवगन, तापसी पन्नू तसचं लता मंगेशकर अशा अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नीरज चोप्राचं कौतुक केलंय.