निर्माती एकता कपूरच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर मंगळवारी आयकर विभागाने छापा घातला. दिवसभर सुरू असलेल्या या कारवाईत एकूण आठ ठिकाणी छापे घालण्यात आले. एकताचे वडील आणि अभिनेते जितेंद्र यांच्याही घरावर याप्रकरणी छापा घालण्यात आला. करचुकवेगिरी प्रकरणात हे छापे घालण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून आयकर विभागाच्या पथकाने एकता कपूरच्या करचुकवेगिरी प्रकरणात ठिकठिकाणी छापे घालण्यास सुरुवात केली. या पथकात शंभरहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जुहू येथील एकता कपूर आणि अभिनेते जितेंद्र यांचे निवासस्थान, ‘बालाजी टेलिफिल्म्स’चे अंधेरी येथील कार्यालय तसेच काही खासगी कार्यालयांवर हे छापे घालण्यात आले.
एकता कपूरचा भाऊ अभिनेता तुषार कपूर याच्या वांद्रे येथील घराचीही तपासणी करण्यात आली. मंगळवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती. यावेळी एकता कपूर आणि जितेंद्र हजर होते. आयकर विभागाच्या पथकाने काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. परेदशातून काही पैसा आलेला आहे का? आला असल्यास त्याचा तपशील आहे का? याची तपासणी यावेळी करण्यात आली. उत्पन्नाचे स्त्रोत आणि तसेच मालमत्ताविषयक कागदपत्रांची तपासणी यावेळी करण्यात आली. एकता कपूर आणि बालाजी टेलिफिल्म्सच्या संचालकांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. आणखी दोन दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा