Sanju Movie Review Live Updates. रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा बहुचर्चित चित्रपट ‘संजू’ त्याच्या करिअरला खऱ्या अर्थाने कलाटणी देणारा ठरु शकतो. अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटातून काही अशा प्रसंगांवरुन पडदा उचलण्यात आला आहे, जे आतापर्यंत कधीच कोणासमोर आले नव्हते. संजूच्या निमित्ताने दिग्दर्शक राजकुमार हिरानी पुन्हा एकदा तगड्या स्टारकास्टसह प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्याच प्रयत्नांतून साकारलेल्या ‘संजू’चं अधिपत्य बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

वाचा : जेव्हा कारागृहात संजयला करावी लागली होती मजुरी…

share market latest news in marathi
Market roundup : शेअर बाजारात बजेटपूर्व जबरदस्त आशावाद; सेन्सेक्स ७४१ अंशांच्या मुसंडीने ७७,५०० वर
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Premachi Goshta Fame swarda thigale aerial yoga in aata hou de dhingana season 3
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नव्या मुक्ताचं ‘हे’ कौशल्य पाहून चकित व्हाल, ‘स्टार प्रवाह’च्या अभिनेत्यांचीही झाली हालत खराब
car
Maruti Suzuki Price Hike: १ फेब्रुवारीपासून मारुती सुझुकीच्या कार महागणार! कोणत्या कारची किंमत किती वाढली आहे?
mahakumbh mela 2025 viral video
Mahakumbh 2025 : प्रेयसीचा एक सल्ला अन् महाकुंभ मेळ्यात प्रियकर झाला मालामाल, एक रुपया खर्च न करता रोज कमातोय हजारो रुपये; पाहा VIDEO
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?
pune balgandharva rang mandir
पुणे : नाट्यगृहांत चित्रपट संकल्पनेला प्रेक्षकांचे बळ
south suspense thriller movies
थरारक सीन्सच्या जोडीला आहेत चकित करणारे क्लायमॅक्स, मोफत पाहता येतील ‘हे’ चित्रपट

*कारकिर्दीत येणारे चढउतार आणि त्यावर मात करुन उभा राहिलेला खराखुरा संजूही प्रेक्षकांसाठी एक खास भेट देऊन येत आहे. चित्रपटाच्या शेवटच्या गाण्यात खराखुरा संजय दत्त प्रेक्षकांच्या भेटीला येतो. हे गाणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ‘बाबा बोलता है अभी बस्स हो गया….’

*परेश रावल यांनी साकारलेली सुनील दत्त आणि रणबीर कपूरने साकारलेली संजय दत्त यांची भूमिका प्रेक्षकांना नात्यांची, एका व्यक्तीची आणि बऱ्याच अव्यक्त गोष्टींची नवी परिभाषा समजावून जातेय, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

*आपल्या मुलासोबत चित्रपटात काम केल्यानंतर त्याला कामाप्रती असणारी शिस्त शिकवता येईल, या एका भावनेने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट साकारण्यात आला होता.

*’मेरा बेटा कोई गुजरा हुआ वक्त नही, जो लौटकर वापस नही आ सकता’

*आपल्या मुलाला जामीन मिळवून देण्यासाठी सुनील दत्त यांची सुरु असणारी धडपड, एक वडील म्हणून त्यांचं हेलावणारं मन या सर्व गोष्टी चित्रपटात तितक्याच संवेदनशीलपणे हाताळण्यात आल्या आहेत.

*संजय दत्तच्या वडिलांच्या म्हणजेच अभिनेते सुनील दत्त यांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून AK56 देण्यात आल्याचा उलगडा चित्रपटात होतो.

*काही अनपेक्षित गोष्टींचा उल्लेख रसिकांना चित्रपटगृहांमध्ये खिळवून ठेवतो.

*बऱ्याच प्रश्नांची उत्तर देत संजू अशा एका रंजक वळणावर येतो आणि पूर्वार्ध संपतो.

*अमली पदार्थांच्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी म्हणून संजू परदेशात असतो आणि जवळपास दीड वर्षांनी तो भारतात परततो.

*संजूची व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर उतरवताना तो उगाचच रंगवण्यात आला नसून, जसा आहे तसाच चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अगदी त्याच्या उणिवांसह.

*आई, एखाद्याला आयुष्यात किती महत्त्वाची असते, तिचा आपल्या मुलांवर किती प्रभाव असतो, हे चित्रपटातील एका बऱ्याच दृश्यांमधून पाहायला मिळतं.

Sanju movie review and release LIVE UPDATES: Ranbir Kapoor is ‘absolutely believable as Sanjay Dutt’

*’कपडोंकी अहमियत तब पता चली जब तक साफ थे, लिफ्ट
मिलती रही… जब मैले हुए तब भीक मिली’

*चित्रपटातील संवाद अगदी सहजसोपे पण, तितकेच प्रभावी

*संजूसाठी नर्गिस यांनी लिहिलेलं ते अखेरचं पत्रं….

*’रॉकी’ या चित्रपटाच्या प्रिमिअरच्या आठवडाभराआधीपासूनच संजूच्या आईची म्हणजेच अभिनेत्री नर्गिस यांची प्रकृती खालावत जाते आणि अखेर त्याच्यावरचं मायेचं छत्र हरवतं.

*संजूच्या आयुष्यात यश आणि त्यासोबत येणाऱ्या अडचणी हे एक वेगळंच समीकरण होऊन बसलेलं असतं.

*इथे संजू मात्र मंगळसूत्र विकून त्या पैशांची आणलेल्या अमली पदार्थांचं सेवन करत असतो. त्याचं हे असं विक्षिप्त वागणं पाहून टीना पुन्हा एकदा संजूच्या आयुष्यातून निघून जाते.

*कमलेश (विकी कौशल) टीनाची समजूत काढून संजूशी लग्न करण्यासाठी तिला तयार करतो. लग्नासाठी तिला विवाह नोंदणी कार्यालयातही नेतो.

*परदेशातून आलेला तो मित्र संजूला या परिस्थितीतून सावरण्यासाठी बरीच मदत करतो.

*संजू अमली पदार्थांच्या इतका आहारी जातो की, त्या परिस्थितीत आधार म्हणून तो आपल्या परदेशातील मित्राला म्हणजेच विकी कौशलला भारतात बोलावून घेतो.

*टीना आपल्या आयुष्यात नसण्याचा प्रसंग पुन्हा एकदा संजूला अमली पदार्थांच्या जाळ्यात ढकलून जातो.

*नर्गिस यांच्या प्रकृतीविषयी कळताच संजू, त्याची प्रेयसी टीना मुनीम हिला लग्नाची मागणी घालण्यासाठी म्हणून येतो. पण, इथे मात्र टीनाचं लग्न कोणा दुसऱ्याशीच ठरलेलं असतं.

*आईच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते सर्वजण (दत्त कुटुंबिय) मायदेशी परतात. पण, नर्गिस यांच्याकडे आता फार कमी दिवस शिल्लक असल्याचं लक्षात येतं.

*परदेशात भेटलेल्या या नव्या मित्रासोबत संजूची घनिष्ट मैत्री होते.

*नर्गिस यांची प्रकृती बिघडत असल्याचं लक्षात येताच सुनील दत्त संजूलाही परदेशात बोलावून घेतात आणि तिथे त्याची एका मित्राशी भेट होते. त्या मित्राच्या भूमिकेत झळकतोय अभिनेता विकी कौशल.

*नर्गिस यांना झालेल्या कर्करोगाच्या उपचारासाठी म्हणून सुनील दत्त आणि त्या न्यूयॉर्कला गेले असता इथे संजू मात्र त्यांच्या हातातून निसटत जातो.

*कर्करोगाचं निदान आणि नर्गिस म्हणजेच संजय दत्तच्या आईच्या भूमिकेत असणाऱ्या मनिषा कोइरालाचा चित्रपटातील प्रवेश… संजूच्या आयुष्यातील आणखी एक धक्कादायक वळण.

*संजय दत्तला अमली पदार्थ घेण्याची सवय नेमकी कधी लागली यावरुनही चित्रपटामध्ये पडदा उचलण्यात आला आहे.

*विकी कौशलप्रमाणेच आणखी एक बॉलिवूड अभिनेता संजूच्या मित्राच्या भूमिकेत. तो अभिनेता म्हणजे जिम सर्भ.

*संजू धुम्रपाम करतोय, हे करताच वडिलांच्या भूमिकेत दिसणाऱ्या परेश रावल यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे. ‘या तो तू सिगरेट बंद करदे, या मै पिक्चर बंद कर दूँगा’, हा त्यांचा संवाद काळजाला भिडतो.

* चित्रपटाचं कथानक हळूच आपल्यासाठी भुतकाळाची कवाडं खुली करुन देतं.

*’तुम तो बॅड चॉइसेस के किंग हो…’, असं म्हणणारी मान्यता (दिया मिर्झा) लगेचच सर्वांचं लक्ष वेधते.

*दहशतवादी समजून त्याच्या आयुष्यावर आधारित पुस्तक लिहिण्यास लेखकांचाही नकार

*खरा संजय दत्त हा दहशतवादी नव्हता, हेच सर्वांना पटवून देण्यासाठी म्हणून संजय दत्त आत्मकथा लिहिण्याचा निर्णय घेतो.

*आयुष्य संपवण्याच्या विचारात असणारा संजय दत्त त्याच्या पत्नीसाठी एक पत्रही लिहितो. पण, ती (मान्यता दत्त) त्याला असं करण्यापासून थांबवते.

*पाच वर्षांच्या शिक्षेची सुनावणी होते आणि खऱ्या अर्थाने संजू उलगडण्यास सुरुवात होते.

*’संजू’च्या प्रवासाला सुरुवात

मध्यवर्ती भूमिकेत दिसणाऱ्या रणबीरव्यतिरिक्त या चित्रपटातून अभिनेत्री सोनम कपूर, अनुष्का शर्मा, मनिषा कोइराला झळकणार आहेत. तर, ज्येष्ठ अभिनेते परेश रावल ‘कॅप्टन ऑफ द शिप’ म्हणजेच संजय दत्तच्या वडिलांच्या, दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांच्या भूमिकेत झळकत आहेत. तेव्हा आता संजू नेमका कसा होता, त्याच्या आयुष्यात नेमके कोणते असे प्रसंग आले ज्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा देशवासियांचाही दृष्टीकोन बदलला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, ‘संजू’च्या अधिकृत घोषणेपासून ते आतापर्यंत या चित्रपटाला प्रेक्षकांचं बरंच प्रेम मिळालं आहे. त्यामुळे प्रदर्शनानंतरही प्रेक्षकांमध्ये असणारी ही उत्सुकता आणि हे कुतूहल कायम राहतं का, यावरच चित्रपटाच्या यशाची मदार असणार आहे.

दरम्यान या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता सुरुवात झाली असली तरीही काही सेलिब्रिटी आणि चित्रपटसृष्टीतील  दिग्गजांसाठी ‘संजू’च्या खास स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यानंतर अनेकांनीच या चित्रपटाची प्रशंसा केल्याचं पाहायला मिळालं.

 

Story img Loader