अफाट वेग आणि त्या वेगाच्या साहाय्याने कार रेसिंगमधील काळे विश्व उलगडणारा ‘फास्ट अॅण्ड फ्युरिअस’ या मालिकेतील प्रत्येक चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो. याच चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या पॉल वॉकरने तर जगभरातील तरुण-तरुणींना वेड लावले. मात्र चित्रपटांमध्ये वेगाने कार चालवणाऱ्या या अभिनेत्याचा मृत्यूही झाला एका कार अपघातात. अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया भागात शनिवारी रात्री एका कार्यक्रमातून परतताना वॉकरच्या कारने रस्त्यावरच पेट घेतला आणि त्यात त्याचा मित्रासह मृत्यू झाला. त्याच्या निधनाने हॉलीवूडच नाही तर बॉलीवूडही हळहळले आहे. बॉ़लीवूड सेलिब्रिटींनी ट्विटरून त्यांचे दुःख व्यक्त केले. सेलिब्रिटींनी केलेले ट्विट्सः

अभिनेत्री प्रिती झिंटा
हॉलीवूड अभिनेता पॉल वॉकरच्या अपघाती मृत्यूची बातमीने फार दुःख झाले. आयुष्य हे फार छोटे आहे. देव त्याच्या आत्म्याल शांती देवो.

 

 

 

Story img Loader