हिंदी चित्रपटांना ८० आणि ९० च्या दशकामध्ये पॉप संगीताची ओळख करुन देणारे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं आज (१६ फेब्रुवारी २०२२ रोजी) निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते. बप्पी लहरी यांच्या निधनासंदर्भात अनेकांनी सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केलाय. भारतीयांना डिस्को गाण्यांची ओळख करुन देणारा आणि त्याबद्दल प्रेम निर्माण करणारा संगीतकार आपल्यातून निघून गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय. बप्पीदा नावाने लोकप्रिय असणारे बप्पी लहरी हे त्यांच्या गाण्याबरोबरच सोनं, कपडे यासहीत क्रिकेट प्रेमासाठीही ओळखले जायचे. विशेष म्हणजे त्यांच्या कोट्यावधी चाहत्यांमध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. या दोघांमध्ये एक अनोखं नातं होतं. दोघेही एकमेकांचे चाहते होते. याबद्दल त्यांनी अनेकदा उघडपणे भाष्यही केलंय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा