मध्यंतरी प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माची प्रकृती बिघडल्याचं वृत्त समोर आलं होतं. एंड्रिला बरेच दिवस कोमात होती, पण वयाच्या २४ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. कोलकातामधील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिला मंगळवारी हृदयविकाराचे अनेक झटके आल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. कोलकाता हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला सीपीआर देण्यात आला होता त्यानंतर तिची प्रकृती खूपच नाजूक होती. मृत्यूशी लढणाऱ्या एंड्रिला शर्माची ही झुंज अशस्वी ठरली आहे.

१ नोव्हेंबरला ब्रेन स्ट्रोक आल्याने एंड्रिलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिला इंट्राक्रॅनियल हॅम्रेज झाले होते, त्यानंतर मेंदुच्या डाव्या भागात फ्रंटोटेम्पोरोपॅरिएटल डी-कंप्रेसिव्ह क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करावी लागली होती. आनंदबाजार डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, एंड्रिलाच्या नवीन सीटी स्कॅन अहवालात तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचंही आढळून आलं होतं.

आणखी वाचा : अभिनेते कबीर बेदी यांनी व्यक्त केली मुलगा गमावल्याबद्दल खंत; म्हणाले, “त्याला आत्महत्या करण्यापासून…”

मीडिया रिपोर्ट्सनुसार गायक अरिजित सिंग अभिनेत्रीच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. स्वत: अरिजीतने त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला असल्याचं वृत्त समोर आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, एंड्रिलाच्या हॉस्पिटलचे मेडिकल बिल आतापर्यंत १२ लाखांपेक्षा जास्त झालं आहे. अरिजित सिंग आणि एंड्रिला दोघेही मुर्शिदाबादचे आहेत. याची खबर मिळताच अरिजित एंड्रिलाच्या मदतीसाठी पोहोचला. आणखीनही काही अभिनेत्रींनीही तिच्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे केला आहे.

तिच्या जाण्याने बंगाली चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एंड्रिलाचा जन्म पश्चिम बंगालमधील बेरहामपूर येथे झाला होता. तिने ‘झुमुर’ मालिकेतून टीव्ही पदार्पण केलं होतं आणि ‘महापीठ तारपीठ’, ‘जीवन ज्योती’ आणि ‘जिओ काठी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं. तसेच ‘अमी दीदी नंबर १’ आणि टलव्ह कॅफेट सारख्या चित्रपटांतही ती दिसली होती.

Story img Loader