करोनाची लागण झालेली आणि आपल्या पार्टीमुळे टीकेची मानकरी झालेली बॉलिवूड गायिका कनिका कपूर आता हॉस्पिटलमध्ये आपला तोरा दाखवू लागली आहे. व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट द्या अशी मागणी करत ती डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत आहे.

लखनऊ आणि इतर अनेक शहरांतील व्हिआयपी लोकांना कनिका कपूरमुळे क्वारंटाइन व्हावं लागलं. कनिका कपूरला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ती सध्या लखनऊ येथील संजय गांधी पीजीआयएमएस या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. पण, तेथेही आपले टॅन्ट्रम तिने कायम ठेवले आहेत.

या हॉस्पिटलचे संचालक डॉ. आर. के. धिमान यांनी सांगिलतं की, तिच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरू आहेत. पण, तिने एका स्टारसारखं वागू नये. ती आता पेशन्ट आहे आणि पेशन्टसारखंच वर्तन तिनं करावं. व्हिव्हिआयपी ट्रिटमेंट मिळावे यासाठी ती डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत आहे.

तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. तेथील सर्व सुविधा तिला दिल्या जात आहेत. अनेक अत्याधुनिक उपकरणंही तिच्यासाठी तेथे आहेत. तरीही तिने व्हिव्हिआयपी ट्रिटमेंटसाठी घालायला सुरूवात केली आहे.

Story img Loader