काही दिवसांपूर्वी बिहारमधील एका मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासमोर हात जोडून त्याच्या अभ्यासाची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. त्याने आपला संपूर्ण मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर अतिशय सहजतेने मांडला होता. लोकांना या मुलाच्या आत्मविश्वासाबद्दल कौतुक वाटले. त्याला शिकायचे आहे, आयएएस, आयपीएस व्हायचे आहे, असे त्याने मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. पण सरकारी शाळेत शिक्षण मिळत नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली. अशा परिस्थितीत बिहारच्या सोनूने आपल्या अभ्यासाची व्यवस्था करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आधीच अभिनेता सोनू सूद यांने या लहानग्याची इच्छा पूर्ण केली आहे.

शिक्षणासाठी चिमुकल्याची धडपड; मुख्यमंत्री नितीश कुमारांना हात जोडून केली विनंती, VIDEO व्हायरल

बिहारच्या नालंदा येथील रहिवासी असलेल्या सोनूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून लोक अनेक त्याच्या मदतीसाठी पुढे येऊ लागले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या काळात लोकांचा मसिहा बनलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. सोनू सूदने त्याला पाटणा येथील एका खाजगी शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे.

सोनूने ट्विट करून ही माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे. सोनू सूदने लिहिले, ‘सोनूने सोनूचे ऐकले. भाऊ, शाळेची बॅग भरा. तुमच्या संपूर्ण शिक्षणाची आणि वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.’ ट्विटनुसार, सोनूचे अ‍ॅडमिशन पाटणा जिल्ह्यातील बिहटा येथील आयडियल इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर १८ मे रोजी माजी खासदार आणि जापचे अध्यक्ष पप्पू यादव देखील सोनूला भेटण्यासाठी त्याच्या गावी पोहोचले होते. त्यांनी सोनूला ५० हजार रुपयांची मदत दिली आणि सोनूला आयएएस होईपर्यंत शिकवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी राज्यसभा खासदार सुशील मोदीही सोनूला भेटायला आले होते आणि त्यांनी त्याला नवोदय विद्यालयात दाखल करण्याबाबत सांगितले होते. यासोबतच दरमहा दोन हजार रुपयांची मदतही देण्यात येईल असे सांगितले. त्याचवेळी अभिनेत्री गौहर खाननेही ट्विट करून सोनूला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Story img Loader