‘सैराट’ चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्याने उभ्या महाराष्ट्राला थिरकायला भाग पाडले आहे. चित्रपटगृहात ‘सैराट’चा शो सुरू असताना अजय-अतुलच्या ‘झिंगाट’ या अफलातून गाण्यावर ठेका धरण्याचा मोह प्रेक्षकांना आवरता आलेला नसल्याचे आपण पाहिले. मात्र, ‘झिंगाट’ गाण्यावर बॉलीवूडच्या सुपरस्टार्सला बेफाम डान्स करताना तुम्ही पाहिलंय का? बॉलीवूडकर ‘झिंगाट’ गाण्यावर थिरकतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पण, हा व्हिडिओ खरा नसून तो बॉलीवूड चित्रपटांच्या काही गाण्यांच्या नृत्याचे संकलन करून तयार करण्यात आलेला आहे. ‘झिंगाट’ गाण्यावर अमिताभ बच्चन यांच्यापासून शाहरुख, नाना पाटेकर, सलमान खान, अनिल कपूर, सनी देवोल हे बॉलीवूडकर थिरकताना पाहायला मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडिओ-

(सौजन्य- ‘९ एक्स झकास’)

व्हिडिओ-

(सौजन्य- ‘९ एक्स झकास’)