बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारलेले अभिनेते रामी रेड्डी त्यांच्या क्रूर व्यक्तिरेखांसाठी ओळखले जातात. १९९३ मधील ‘वक्त हमारा है’मधील कर्नल चिकाराची भूमिका असो किंवा ‘प्रतिबंध’मधील अन्ना, रामी खलनायकाच्या प्रत्येक व्यक्तिरेखेत आपली एक वेगळी छाप सोडली. मात्र २५० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या रामी यांना यकृताच्या आजाराने ग्रासलं होतं. यामुळे ते नेहमी आजारी पडत होते. मृत्यूपूर्वी त्यांचं शरीर म्हणजे अक्षरश: हाडांचा सापळा झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यकृताच्या समस्येमुळे रामी लोकांसमोर येणं टाळत होते. मात्र, एकदा एका कार्यक्रमामध्ये जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा सर्वजण थक्कच झालेले. त्यावेळी त्यांना ओळखणंही कठीण होतं. आजारामुळे बरंच वजन घटल्याने रामी खूप बारिक दिसत होते. यकृतानंतर मूत्रपिंडाच्या आजारानेही त्यांना ग्रासलं. काही महिन्यांच्या उपचारानंतर अखेर १४ एप्रिल २०११ रोजी सिकंदराबादमधील एका खासगी रुग्णालयात रामी रेड्डी यांचं निधन झालं.

वाचा : योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळासोबत बघणार ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ 

रामी यांनी आंध्र प्रदेशच्या उस्मानिया विद्यापीठातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं होतं. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते एक पत्रकार होते. ‘मुन्सिफ डेली’ नावाच्या वृत्तपत्रात त्यांनी नोकरीही केली होती. १९९० मध्ये ‘अंकुशम’ या तेलुगू चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील त्यांची भूमिका आणि संवाद प्रसिद्ध झाले होते. याच वर्षी त्यांना ‘प्रतिबंध’ या बॉलिवूड चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यामधील त्यांची ‘अन्ना’ची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आणि टॉलिवूडसोबतच ते बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध झाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood villain rami reddy condition before death
Show comments