बहुचर्चित ‘धूम ३’ चित्रपट आज (शुक्रवार) चित्रपटगृहात झळकला. प्रेक्षकांच्या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. बॉलिवूड सुध्दा यात मागे नसून, ‘धूम ३’ची वाखाणणी करणारे आणि शुभेच्छा देणारे संदेश सोशल मिडीयावर झळकत आहेत.
अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक या चित्रपटात काम करत आहे. टि्वटरवरील आपल्या संदेशात अमिताभ म्हणतात.

 रितेश देशमुखने देखील टि्वटर आपला संदेश पोस्ट केला आहे.

चित्रपट निर्माता कुणाल कोहलीने ‘धूम ३’ चा प्रिमियर शो पाहिला असून, आज पुन्हा हा चित्रपट पाहाणार असल्याचे अपल्या संदेशात म्हटले आहे.

 कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानने आपल्या संदेशात ‘धूम ३’साठी अभिषेकचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. फराहच्या ‘हॅपी न्यू इयर’या आगामी चित्रपटात अभिषेक दिसणार आहे.

 स्वत: अभिषकने टि्वटरवरील आपल्या संदेशात आज ‘धूम डे’ असल्याचे म्हटले आहे.

‘यश राज फिल्म्स’च्या ‘धूम’ चित्रपटमालिकेतील ‘धूम ३’या तिसऱ्या चित्रपटात आमिर खानबरोबर कतरिना कैफ, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader