आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व खूप जास्त आहे. आपल्याला लहानपणापासून शिक्षणाचे बाळकडू दिले जाते. शिक्षणामुळेच आपण आपला विकास करू शकतो, आयुष्यातली स्वप्न पूर्ण करू शकतो आणि ध्येय गाठू शकतो. शिक्षण आपल्याला ज्ञान तर देतंच पण आपली स्वप्न पूर्ण करण्यात शिक्षणाचा वाटा मोठा असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षण आवश्यक आहे, पण ते सर्वच क्षेत्रात गरजेचं आहे, असंही नाही. याची प्रचिती तुम्हाला काही बॉलीवूड अभिनेत्रींचं शिक्षण पाहिल्यावर येईल. उच्च शिक्षण न घेताही अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या काही बॉलीवूड अभिनेत्री आहेत. त्यांचं शिक्षण खूप कमी आहे, पण त्यांच्या कलेमुळे, अभिनयामुळे त्या प्रसिद्ध आहेत. जाणून घेऊया अशा ५ अभिनेत्रींची नावं ज्या १२ वीही उत्तीर्ण झाल्या नाहीत.

कतरिना कैफ

अलीकडेच ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री कतरिना कैफ हिने आपले शालेय शिक्षणही पूर्ण केले नाही. तिच्याबद्दल उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, होम ट्यूटरद्वारे तिने घरीच शिकून १२वीची परीक्षा दिली होती.

कंगना रणौत

बॉलीवूडची क्वीन कंगना रणौत ही सुद्धा शिक्षणाच्या बाबतीत काहीशी मागेच राहिली. कंगना १२ वीच्या परिक्षेत नापास झाली होती. त्यानंतर ती घर सोडून ती दिल्लीला आली. तिथे तिने मॉडलिंगद्वारे तिचं करिअर सुरू केलं आणि नंतर ती मुंबईत आली आणि चित्रपट करू लागली.

हेही वाचा… ‘या’ फ्लॉप चित्रपटामुळे करोना काळात टीमचं घर चाललं; रोहित शेट्टीचा खुलासा, म्हणाला…

करिश्मा कपूर

लोलो म्हणून ओळखली जाणारी ९० च्या दशकातली अभिनेत्री करिश्मा कपूर हिचं शिक्षणही काही कारणास्ताव अपूर्ण राहिलं. लहान वयातच चित्रपटांमध्ये काम सुरू केल्याने ती तिचं शिक्षण पूर्ण करू शकली नाही. करिश्माने सहावीनंतर तिचं शिक्षण सोडलं होतं.

काजोल

आपल्या अभिनयाने सर्वांना प्रेमात पाडणाऱ्या काजोलनं आभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवताच शिक्षण सोडलं. खरं तर, वयाच्या १६ व्या वर्षीच तिने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता आणि ‘बेखुदी’ या चित्रपटामध्ये काम केलं होतं. त्यानंतर तिचं शालेय शिक्षण सुटलं. ती बारावीपर्यंतचंही शिक्षण घेऊ शकली नाही.

हेही वाचा… Bigg Boss 17 मध्ये अंकिता लोखंडेच्या पतीने प्रसिद्धी अन् पैसा दोन्ही कमावलं, विकी जैनला शोसाठी मिळालं ‘इतकं’ मानधन

आलिया भट्ट

बॉलीवूडच नव्हे तर हॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री आणि महेश भट्ट यांची कन्या आलिया भट्ट तरुण वयातच अभिनेत्री बनली. त्यामुळे तिला शिक्षण पूर्ण करता आलं नाही. मात्र, शिक्षण सोडून झाल्यानंतर काही कालावधीने तिने बारावीची परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण झाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12th fail bollywood actress katrina kaif kangana ranaut karisma kapoor kajol alia bhatt did not pass 12th exam dvr
Show comments