बॉलीवूड अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या त्याच्या ‘12th fail’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटासाठी ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जाहीर झाला होता. ‘12th fail’ चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विक्रांत मेस्सीने त्याच्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकेपासून केली होती. परंतु, विक्रांतने खुलासा केला की, त्याने आता टीव्ही इंडस्ट्री सोडली आहे. यामागचे कारणही त्याने स्पष्ट केले आहे. विक्रांतने ‘बालिका वधू’, ‘धरम वीर’, ‘बाबा ऐसो वर ढूंढो’ अशा मालिकांमध्ये काम केले; तर बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर ‘छपाक’, ‘हसीन दिलरुबा’, ‘लूटेरा’, ‘गिन्नी वेड्स सनी’ व आता ‘12th fail’ हे चित्रपट केले.

हेही वाचा… रितेश – जिनिलीया कुटुंबासह फुटबॉल मॅच पाहण्यासाठी पोहोचले सौदी अरेबियात; मेस्सीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

‘एबीपी लाइव्ह’ला दिलेल्या मुलाखतीत विक्रांतने मालिका सोडल्याचे कारण सांगितले, “मालिका सोडण्यामागे माझे एक कारण होते. मला आता मालिकांमध्ये काम करायला आवडत नाही. ते जो कॉन्टेन्ट बनवीत आहेत, तो आजही मला निकृष्ट दर्जाचा वाटतो. कदाचित हीच त्यांची मनोरंजनाची व्याख्या असावी. स्त्रियांना त्यांच्या हक्काच्या अगदी काहीच भूमिका मिळतात; अन्यथा त्यांना बहुतेक वेळा फक्त निकृष्ट दर्जाच्या भूमिका दिल्या जातात,” असं विक्रांत म्हणाला.

पुढे विक्रांत म्हणाला, “मी ‘बालिका वधू’ मालिकेमध्ये काम केलं आहे आणि याचा मला फार गर्व आहे. या मालिकेमुळे महिला सुरक्षा आणि लहान मुलींच्या शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली. अशा कॉन्टेन्टसाठी काम केल्यानंतर खूप निर्मात्यांसह माझे वाद झाले. त्यामुळे त्यांनी मला मालिकांमधून काढूनही टाकलं होतं. ओटीटी आणि चित्रपटांविषयी बोलायचं झालं, तर यातील प्रत्येक पात्र बारकाईनं दाखवलं जातं आणि चित्रपटांमध्ये काम करण्याचा एक वेगळाच अनुभव असतो. त्यामुळे यात काम करायला मला खूप आवडतं.”

हेही वाचा… ‘अ‍ॅनिमल’नंतर पुन्हा एकदा “जमाल कुडू” गाण्यावर थिरकला बॉबी देओल; भाचीच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, विक्रांतच्या आगामी चित्रपटाबाबत सांगायचे झाले, तर एकता कपूरच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटात विक्रांत झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12th fail fame vikrant massey left the tv serials and shared his experience of movies and serials dvr