२००८ साली ख्रिसमसच्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘गजनी’ या चित्रपटाला १५ वर्षं पूर्ण होत आहेत. ए.आर. मुरुगदास यांच्या २००५ साली आलेल्या ‘गजनी’चा हा रिमेक, परंतु त्याहीआधी प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनच्या ‘मेमेंटो’ या इंग्रजी चित्रपटावरच हे दोन्ही चित्रपट बेतलेले आहेत. आज आपण ‘अ‍ॅनिमल’ला हिंसक चित्रपट म्हणत आहोत, पण तसाच काहीसा हिंसक ‘गजनी’ हा त्यावेळी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता.

अर्थात या गोष्टीला चित्रपटाची मार्केटिंग स्ट्रॅटजी आणि लोकांची तेव्हाची मानसिकता या गोष्टीदेखील कारणीभूत होत्या. सर्वत्र आर्थिक मंदी पसरलेली असताना आमिर खानसारखा अभिनेता रस्त्यावर उतरून लोकांचे खास हेअर कट करत होता, अशा वेगवेगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटजीमुळे त्यावेळी ‘गजनी’ बॉक्स ऑफिसवर गाजला. इतकंच नव्हे तर ‘गजनी’ हा बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपटही ठरला.

stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
Anant Madhavan
सेटवर लागलेली आग, ५२ जणांचा मृत्यू आणि प्रसिद्ध अभिनेत्यावर ७३ सर्जरी; अनंत माधवन आठवण सांगत म्हणाले, “ती रात्र…”
Loksatta anvyarth Confusion in Assembly session after Jammu and Kashmir became Union Territory
अन्वयार्थ: काश्मिरी राजकारणाचा बदलता ‘दर्जा’

८० च्या दशकातील चित्रपटात ज्याप्रमाणे अॅक्शनचा मसाला, एक सुंदरशी लव्ह स्टोरी, एक सर्वगुण संपन्न असा हीरो अन् एक अत्यंत क्रूर व्हिलन आणि बदल्याची कहाणी या सगळ्या गोष्टी असायच्या. त्याच सगळ्या गोष्टी ‘गजनी’मध्ये ठासून भरण्यात आल्या होत्या. शिवाय २००८ च्या दरम्यान जेव्हा ‘दिल चाहता है’, ‘जब वी मेट’, ‘अ वेनसडे’, ‘ओमकारा’, ‘ब्लॅक’ आणि ‘रंग दे बसंती’सारखे चित्रपट प्रेक्षकांची अभिरुचि बदलण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा याच गर्दीत ‘गजनी’सारखा चित्रपट १०० कोटींची कमाई करून गेला ही गोष्ट तेव्हा जरी पचनी पडली असली तरी आता आपल्याला नक्कीच खटकू शकते.

आणखी वाचा : दलेर मेहंदी यांनी ९० च्या दशकातच गायलं होतं ‘मोये मोये’ गाणं; गायकानेच सांगितला याचा नेमका अर्थ

‘गजनी’मधील कित्येक गोष्टी आज पाहिल्या तर त्या किती हास्यास्पद आहेत याची आपल्याला जाणीव होईल. जसं चित्रपटाचा पहिलाच ओपनिंग सीन जिथे मेडिकलचे प्रोफेसर मेडिकलच्या विद्यार्थ्यांना सांगताना दिसतात की “मेंदू हा शरीराच्या सगळ्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो.” आता जर ते मेडिकलचे विद्यार्थी असतील तर मग ही साधी गोष्ट त्यांना त्यांच्या शालेय जीवनात कुणीच सांगितली नसेल काय?

Ghajini-2
फोटो : इंडियन एक्सप्रेस

आमिरचं संजय सिंघानिया हे पात्र एका बड्या मोबाइल फोन कंपनीचा मालक दाखवला आहे ज्याच्या अवती भवती सतत ८ ते १० लोकांचा गराडा आणि काही बॉडीगार्ड असतात. परंतु जसं संजय सिंघानीया आणि त्याच्या प्रेयसीवर हल्ला होतो अन् त्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस होतो त्यानंतर त्याच्या आसपास एक काळं कुत्रंही फिरकताना दिसणार नाहीत, बॉडीगार्ड तर फार दुरची गोष्ट. इतकी वर्षं एवढं मोठं साम्राज्य उभं करण्यात मदत करणाऱ्या, कायम सुटा-बुटात फिरणाऱ्या त्याच्या मॅनेजर्सच्या ताफ्याचं असं अचानक गायब होणं याचं उत्तर आमिर खानदेखील देऊ शकणार नाही.

विस्मृतीनंतर संजय सिंघानीयाच्या आसपास कुणीही नाही, अगदी त्याच्या घरी तुम्हाला एकही नोकर चाकर पाहायला मिळणार नाही, परंतु त्याचं घर अत्यंत पद्धतशीरपणे आवरलेलं आहे. संजयच्या आयुष्याचं ध्येयच ‘कल्पनाच्या खुनाचा बदला’ आहे हे त्याच्या घरच्या भिंतीवर, टेबलवर इतकंच नव्हे तर शरीरावर गोंदवलेलं आहे. इतकंच नव्हे तर दैनंदिन कामं करण्यासाठीही संजयच्या घरात बरोबर पुणेरी पाट्यांप्रमाणे सुचनांचे फलक लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. संजय सिंघानिया सकाळी उठतो, अंघोळीसाठी बाथरूममध्ये जातो, तिथे जेव्हा तो शर्ट काढतो तेव्हा आपल्या शरीरावर गोंदवलेले टॅटू पाहून त्याला त्याचा फ्लॅशबॅक आठवतो, नंतर चवताळलेला संजय सिंघानिया मस्त फिल्मी स्टाईलमध्ये आंघोळ करून गजनीच्या माणसांना यमसदनी धाडायला निघतो. १५ मिनिटांनी सगळं विसारणाऱ्या शॉर्ट मेमरी लॉसच्या रुग्णासाठी ही तर फार सामान्य गोष्ट आहे नाही का?

ghajini
फोटो : इंडियन एक्सप्रेस

एकेकाळी काजोल, जुही चावला किंवा प्रीती झिंटा यांनी साकारलेल्या बऱ्याच पात्रांची मिसळ तुम्हाला ‘गजनी’च्या कल्पना या पात्रात तुम्हाला बघायला मिळते. अगदी खरं सांगायचं झालं तर ही स्टाईल असिनला तेवढी शोभून दिसत नाही. याबरोबरच जिया खानचं अनावश्यक आयटम सॉन्ग आणि खेचलेली लव्ह स्टोरी यामुळे गजनी तेव्हा जरी रटाळ वाटला नसला तरी आता कुणीच ३ तासांचा ‘गजनी’ पुन्हा पाहायचं धाडस करणार नाही.

प्रेक्षकसुद्धा संजय सिंघानीयाप्रमाणे हा चित्रपट १५ मिनिटांत विसरू शकले असते तर फारच मज्जा आली असती नाही का? जेव्हा पहिला १०० कोटी कामावणाऱ्या हिंदी ‘गजनी’बद्दल क्रिस्तोफार नोलनला समजलं तेव्हा तो फारच नाराज झाला, ल्या ‘मेमेंटो’ या चित्रपटाला कुठेही क्रेडिट न देता ए.आर. मुरुगदासने एक नव्हे तर दोन दोन चित्रपट काढल्याने नोलन जरा खट्टू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. इथे नोलनला खरंच सांगावंसं वाटतं की ‘गजनी’ हा त्याच्या मास्टरपीस असलेल्या ‘मेमेंटो’च्या जवळपासही फिरकणारा नाही. दोन्ही चित्रपटात प्रचंड तफावत आहे. ‘मेमेंटो’ची कथा शेवट ते सुरुवात अशा अनोख्या म्हणजेच नॉन-लिनीयर पद्धतीने मांडण्यात आली आहे, तर ‘गजनी’ला ना सुरुवात आहे, ना मध्य आणि ना शेवट, केवळ लोकांना या गोष्टी पाहायला आवडतात म्हणून हा चित्रपट ‘आहे’ बास!