‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पदुकोणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने बॉलिवूड किंग शाहरुख खानसह स्क्रीन शेअर केली होती. ९ नोव्हेंबर २००७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४९ कोटींचा गल्ला जमवला होता. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. शाहरुखच्या मित्राची भूमिका त्याने साकारली होती. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रेयस तळपदेने ‘ओम शांती ओम’ चित्रपटात काम करण्याअगोदर बॉलिवूडच्या दोन हिट चित्रपटातून त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. ‘अपना सपना मनी मनी’ आणि ‘इक्बाल’ या चित्रपटातून त्याने अभिनयाची छाप पाडली होती. त्यामुळे फराह खानने ‘ओम शांती ओम’साठी विचारल्यानंतर चित्रपटाची कथा ऐकण्यापूर्वीच त्याने होकार कळवला होता. बॉलिवूडच्या बादशहाबरोबर काम करण्याची संधी मिळणार असल्यामुळे तो खूश होता. श्रेयसने या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख खानसह काम केल्याचा अनुभव एका मुलाखतीदरम्यान सांगितला.

श्रेयस म्हणाला, “मी तेव्हा बॉलिवूडमध्ये नवीन होतो. या चित्रपटाच्या निमित्ताने मला दिग्दर्शक, कोरिओग्राफर फराह खान, शाहरुख आणि दीपिकासह काम करण्याची संधी मिळणार होती. हा अनुभव खूपच छान होता. आत्तापर्यंत मी काम केलेल्या सहकलाकारांपैकी शाहरुख खान हा बेस्ट आहे. त्यामुळेच तो सुपरस्टार आहे”.

हेही वाचा >> “अपूर्वा हा शो नक्कीच जिंकू शकते”, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडलेल्या सदस्याचं वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा >> “दीड वर्षानंतर पहिल्यांदा आईने कुंकू…”, वडिलांच्या निधनानंतर ‘आई कुठे काय करते’मधील अनघाची भावनिक पोस्ट

‘ओम शांती ओम’ चित्रपटातील त्या भूमिकेबद्दल श्रेयस म्हणाला, “माझ्यासाठी ही भूमिका कठीण आणि नवीन आहे, हे चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर मला जाणवलं. शाहरुखच्या मित्राची आणि त्याने पुन्हा जन्म घेतल्यानंतर त्याच वृद्ध मित्राची भूमिका मला साकारायची होती. मला विश्वास होता की मी हे करू शकतो. आणि मी भूमिका साकारली”.

हेही पाहा >> लेकीच्या आगमनासाठी आलिया-रणबीरची जोरदार तयारी, रुग्णालयामधून घरी येताच कुटुंबियांसह नव्या बंगल्यामध्ये करणार गृहप्रवेश

श्रेयसने चित्रपटात शाहरुखसह काम करण्याचा अनुभवही सांगितला. शाहरुख खानने चित्रीकरणाच्या दुसऱ्याच दिवशी श्रेयसचं कौतुक केल्याचं त्याने सांगितलं. “शूटिंगच्या दुसऱ्याच दिवशी मी आणि शाहरुख आमच्या चित्रपटातील सीनच्या शूटसाठी थांबलो होतो. श्रेयस खूप दिवसांनी मी एका चांगल्या सहकलाकाराबरोबर काम केल्याचं मला जाणवलं, असं तो मला म्हणाला. मी काल रात्री घरी गेल्यावर गौरीलाही म्हणालो, या मुलाबरोबर काम करताना मला खरंच मजा आली”, असं श्रेयस म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 years of om shanti om shreyas talpade recalled when shah rukh khan praised him during shooting kak