रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गेल्या आठवड्यात झारा पटेल नावाच्या एका सोशल मीडिया स्टारचा मूळ व्हिडीओ एडीट करून त्यावर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. याप्रकरणी पोलीस तपास सुरू असून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Video: रश्मिका मंदानाचा आक्षेपार्ह बनावट व्हिडीओ व्हायरल, अमिताभ बच्चन यांची कायदेशीर कारवाईची मागणी

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी बिहारमधील १९ वर्षीय तरुणाची चौकशी केली आहे, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. पोलिसांना संशय आहे की याच तरुणाने सर्वात आधी त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ अपलोड केला आणि नंतर तो इतर प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला.

रश्मिका मंदानाने स्वतःच्या ‘त्या’ आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओबाबत सोडलं मौन, म्हणाली…

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की त्या तरुणाच्या अकाउंटवरून सोशल मीडियावर व्हिडीओ पहिल्यांदा अपलोड झाल्यामुळे त्याला चौकशीसाठी नोटीस देण्यात आली होती. १० नोव्हेंबर रोजी, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची युनिट इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स इथे विविध कलमांतर्गत या डीपफेक व्हिडीओप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती.

विश्लेषण: डीपफेक तंत्रज्ञान ठरतेय धोकादायक ! महिलांनी का राहायला हवं सावध?

याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. “त्याने तो व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून डाउनलोड केल्याचं सांगितलं आहे. पण आम्ही त्याची चौकशी करत आहोत,” असे अधिकारी म्हणाले. दरम्यान, मूळचा बिहारचा रहिवासी असलेल्या तरुणाला आयएफएसओ युनिटसमोर हजर राहण्यास आणि ज्या मोबाईल फोनचा वापर व्हिडीओ अपलोड करण्यासाठी केला होता ते आणण्यास सांगितलं होतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader