‘थ्री इडियट्स’ फेम ज्येष्ठ अभिनेते अखिल मिश्रा यांचं निधन झालं आहे. ते ६७ वर्षांचे होते. अखिल मिश्रांचा मंगळवारी राहत्या घरात अपघाती मृत्यू झाला. त्यांची पत्नी सुझान बर्नर्ट यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना या बातमीची पुष्टी केली आहे. त्यांनी ‘थ्री इडियट्स’मध्ये ग्रंथपाल दुबेची भूमिका केली होती.

“तिच्यामुळे दोन मुलांनी आत्महत्या केल्या,” तनुश्री दत्ताचे राखी सावंतवर गंभीर आरोप; म्हणाली, “इतके धर्म बदलूनही…”

36 year old man died after being hit by motor vehicle while returning from relatives funeral
अंत्यविधीवरून येणाऱ्या तरुणाचा हिट ॲण्ड रन अपघातात मृत्यू
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
nashi four year old boy died after being found under car in premises of Hotel Express in
सांगोल्याजवळ वाहनांची धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू
Policeman dies in accident while returning from funeral of women police
अंत्यसंस्कारावरून परतताना पोलिसाचा अपघाती मृत्यू
shirish more suicide letters
शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिल्या चार चिठ्ठ्या
The Aga Khan spiritual leader of Ismaili Muslims, dies aged 88
आगा खान यांचे निधन; इस्माइली मुस्लिमांचे ६८ वर्षे आध्यात्मिक नेतृत्व
laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
old man attacked with iron rod after dispute over financial affairs of running Bhisi
भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून; महिलेसह दोघे अटकेत

या जोडप्याच्या जवळच्या मित्राने फक्त इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की अखिल रक्तदाबाशी संबंधित समस्यांमुळे काही काळापासून अस्वस्थ होते. ते स्वयंपाकघरात एका स्टूलवर चढून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. ते रक्ताच्या थारोळ्यात सापडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर त्यांना वाचवता आलं नाही. रुग्णालयात नेल्यानंतर काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला.

३३ वर्षे ज्या चाळीत राहिले, तिथे जॅकी श्रॉफ यांनी दिली भेट; म्हणाले, “त्या चाळीसाठी माझ्या…”

घटना घडली तेव्हा सुझान बर्नर्ट या एका प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये होत्या. तिथेच त्यांना अपघाताची माहिती मिळाली आणि त्या परत मुंबईत आल्या. पतीच्या अचानक निधनाने सुझान यांना धक्का बसला आहे.

अखिल मिश्रा यांनी ‘हजारों ख्वाहिशे ऐसी, ‘वेल डन अब्बा’, ‘कलकत्ता मेल’ आणि शाहरुख खानचा ‘डॉन’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं होतं. ‘दो दिल बंधे एक डोरी से’, ‘उत्तरन’, ‘परदेस में मिला कोई अपना’ आणि ‘श्रीमान श्रीमती’ यासारख्या टेलिव्हिजन कार्यक्रमातही ते दिसले होते. त्यांची पत्नी जर्मन अभिनेत्री सुझान बर्नर्ट यांनी ‘अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मध्ये काम केलं होतं. पती अखिल मिश्रा यांनी आपल्याला हिंदी शिकण्यास मदत करण्यासाठी आपल्या करिअरमध्ये ब्रेक घेतला, जेणेकरून मला चित्रपटांमध्ये चांगल्या भूमिका मिळू शकतील, असं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Story img Loader