‘दिल तो पागल है’ चित्रपट सगळ्यांना आठवत असेल. यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाने त्या काळी इतिहास बनवला होता. शाहरुख, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूरची भूमिका असलेल्या या चित्रपटाने तरुणाईला वेड लावलं होतं. चित्रपटाच्या कथेबरोबर त्याची गाणही गाजली होती. या चित्रपटात करिश्माने निशाची भूमिका साकारली होती. मात्र, करिश्माच्या अगोदर ही भूमिका पाच अभिनेत्रींना ऑफर करण्यात आली होती. पण या पाचही अभिनेत्रींनी याला नकार दिला होता. काय होतं त्यामागचं कारण?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- हृतिक रोशन आणि सबा आझाद अडकणार लग्नबंधनात? जाणून घ्या त्यांचा वेडिंग प्लान

सर्वात आधी ‘निशा’ची भूमिका जुही चावलाला ऑफर करण्यात आली होती. त्या काळात जुही आणि माधुरी एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जायच्या. त्यामुळे जुहीने ही भूमिका करण्यास नकार दिला. त्यानंतर निर्माते ही भूमिका घेऊन रवीना टंडनकडे गेले. तिनेही नकार दिला. यानंतर यश चोप्रांनी मनीषा कोईराला, उर्मिला मातोंडकर आणि काजोल यांना या भूमिकेसाठी विचारले त्यांनीही या भूमिकेला साफ नकार दिला.

५ अभिनेत्रींकडून नकार ऐकल्यावर यश चोप्रांनी करिश्मा कपूरला या भूमिकेची ऑफर दिली. करिश्मानेही सुरुवातील ही भूमिका नाकारली होती. कारण तिला ‘निशा’चे पात्र आवडले नव्हते. आई बबिताने समजवल्यानंतर तिने या भूमिकेला होकार दिला होता. करिश्मा कपूरला या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा-“भविष्यात नीना गुप्तांबरोबर पडद्यावर रोमान्स…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

करिश्माने माधुरी आणि शाहरुख खानचे कौतुक केले होते. म्हणालेली “दोघांनीही माझ्या अभिनयाला खूप साथ दिली. हे सगळ त्यांच्या मदतीनेच होऊ शकले.” १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल तो पागल है’ने मध्ये इतिहास रचला. हा केवळ त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला नाही तर त्याची गाणी, नृत्य आणि कथेने बॉलिवूडमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू केला.

हेही वाचा- ‘बवाल’ आणि ‘आदिपुरुष’ चित्रपटाचं काय आहे कनेक्शन? बॉयकॉटची होऊ लागली मागणी

‘दिल तो पागल है’ या चित्रपटाच्या शीर्षकाला दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हती. सुरुवातीला ‘मैंने तो मोहब्बत कर ली’ असे नाव ठेवण्याचा विचार करण्यात आला होता. काही दिवस याच शीर्षकासह चित्रपटाचे शूटिंगही करण्यात आले. मात्र, नंतर या चित्रपटाचे शीर्षक ‘दिल तो पागल है’ निश्चित करण्यात आले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 actress rejected madhuri dixit dil to pagal hai film know the reason dpj