मनोरंजनसृष्टीतील कलाकार हे त्यांच्या कलाकृतींबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत असतात. ओ सनम, क्यूँ चलती है पवन अशा गाण्यांसाठी ओळखला जाणारा गायक लकी अली(Lucky Ali) आता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. याबरोबरच, त्याच्या कॉन्सर्टसाठीदेखील तो ओळखला जातो. याबरोबरच, गायकाच्या खासगी आयुष्यामुळेदेखील अनेकदा तो चर्चेत असतो. याआधी त्याची तीन लग्न झाली आहेत. आता एका कार्यक्रमात त्याला चौथे लग्न करण्याची इच्छा असल्याचे त्याने म्हटले आहे.
तीन घटस्फोटानंतर आता गायक लकी अली पुन्हा लग्नबंधनात अडकणार?
दिल्लीमधील सुंदर नर्सरी येथे पार पडलेल्या १८ व्या कथाकार इंटरनॅशनल स्टोरीटेलर फेस्टिव्हल मध्ये लकी अली सहभागी झाला होता.या ठिकाणी त्यांनी सादरीकरणाबरोबरच त्याच्या काही गाण्यांचे किस्सेदेखील सांगितले आहे. या सगळ्यात या कार्यक्रमात लकी अलीने केलेले वक्तव्य सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याला विचारण्यात आले की त्याचे पुढचे स्वप्न काय आहे? त्यावर लगेच उत्तर देत ६६ वर्षीय लकी अलीने म्हटले, “माझं स्वप्न आहे की मला पुन्हा लग्न करायचे आहे.” लकी अलीच्या या वक्तव्यानंतर तो लग्नगाठ बांधणार का, यावर चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. गायकाच्या वक्तव्याचे अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लकी अलीने याआधी तीन वेळा लग्न केले आहे. पहिले लग्न त्याने १९६६ ला केले होते. ऑस्ट्रेलियाच्या मेघन जेन मॅकक्लेरीशी त्याने लग्न केले होते. त्यांना तवुज व तस्मिया ही दोन मुले होती. सुनो या अल्बमच्या निर्मितीवेळी त्यांची भेट झाली होती. मात्र, त्यांचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. त्यांनी घटस्फोट घेतला. पुढे लकी अलीने २००० साली एका पर्शियन महिलेशी लग्न केले. अनाहिता असे तिचे नाव होते. अनाहिताने लग्नानंतर इस्लाम धर्म स्विकारत इनाया असे नाव धारण केले. त्यांना रायन व सारा अशी दोन मुले आहेत. मात्र, गायकाचे हे नातेही अल्पावधीतच संपुष्टात आले. २०१० मध्ये लकी अलीने त्याच्यापेक्षा २५ वर्ष लहान ब्रिटीश मॉडेल केट एलिझाबेथ हलमशी लग्न केले होते. मात्र २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
दरम्यान, लकी अली त्याच्या गाण्यांमुळे मोठ्या चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग मोठा असल्याचे पाहायला मिळते.