68th Filmfare Awards 2023 Winners List: ६८ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. मुंबईत गुरूवारी २७ एप्रिल रोजी संध्याकाळी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी हजेरी लावली. रेड कार्पेटपासून ते स्टेजपर्यंत बॉलिवूड स्टार्सचा जलवा पाहायला मिळाला. या कार्यक्रमाचा यंदाचा होस्ट सलमान खान होता, तर आयुष्मान खुराना व मनीष पॉल को-होस्ट होते. दरम्यान, आता या पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची नावं समोर आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – बदकासारख्या चालीमुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल मलायका अरोराचं स्पष्ट उत्तर; नितंबांचा उल्लेख करत म्हणाली…

यंदा ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘बधाई दो’ या चित्रपटांचा फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये जलवा राहिला. संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ने १० कॅटेगरींमध्ये पुरस्कार जिंकले, तर हर्षवर्धन कुलकर्णीच्या ‘बधाई दो’ने क्रिटीक्स अवॉर्ड कॅटेगरीमध्ये सर्वाधिक सहा पुरस्कार जिंकले. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र: भाग-१ शिवा’ या चित्रपटालाही चार कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना लाइफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला आहे.

संजय लीला भन्साळी यांना ‘गंगूबाई काठियावाडी’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

प्रसिद्ध गायक अरिजित सिंहला ‘ब्रह्मास्त्र’मधील ‘केसरिया’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अवॉर्ड ‘गंगूबाई काठियावाडी’ला मिळाला.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जुगजुग जिओसाठी अनिल कपूर यांना मिळाला.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार बधाई दोसाठी शीबा चढ्ढा यांना देण्यात आला.

क्रिटीक्स अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार भूमी पेडणेकरने ‘बधाई दो’साठी जिंकला.

‘भूल भुलैया २’ साठी तब्बूलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स)- हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स)- संजय मिश्रा (वध)

ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला.

‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी शीतल शर्माला, बेस्ट प्रॉडक्शन डिझाइनसाठी सुब्रत चक्रवर्ती व अमित रे यांना पुरस्कार मिळाला आणि चित्रपटाच्या ‘ढोलिडा’ गाण्यासाठी कृती महेशला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. यानंतर सुदीप चॅटर्जी यांना याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 68th filmfare awards 2023 winners list alia bhatt best actress rajkumar rao best actor gangubai kathiawadi and brahmastra won multiple awards hrc