मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्याची अनेक कलाकार आतुरतेने वाट पाहत होते. पुरस्कारांची घोषणा २४ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत करण्यात आली. यंदाच्या पुरस्कारांमध्ये बॉलीवूडचा डंका पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : बॉलिवूड सिंगर मिका सिंगची तब्येत खालावली; लाईव्ह शोज रद्द झाल्याने गायकाला १५ कोटींचं नुकसान
चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. यंदा बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिला ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि क्रिती सेनॉनला ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आलियाने गंगूबाई काठियावाडी यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने १२९ कोटींचा व्यवसाय केला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारवर यावर्षी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने नाव कोरले आहे. पुष्पा चित्रपटासाठी अभिनेत्याचा सन्मान करण्यात आला. आलिया, क्रिती आणि अल्लू अर्जुन या तिन्ही कलाकारांवर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. यांनी पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार नाव कोरलं आहे.
हेही वाचा : ‘G-20 समिट’चा शाहरुख खानच्या ‘जवान’ला बसणार फटका; दिल्लीतील चित्रपटगृहं राहणार बंद?
दरम्यान, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी यंदा अनेक कलाकारांमध्ये चुरस निर्माण झाली होती. आलिया भट्ट की कंगना राणौत कोण सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर यामध्ये आलियाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारावर नाव कोरले. तसेच ‘द काश्मीर फाइल्स’, ‘गंगुबाई काठीयावाडी’,‘मिमी’, ‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘सरदार उधम’ या चित्रपटांनी यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे.