National Film Awards 2023 Winners : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा २४ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे करण्यात आली. यंदा ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारवर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने नाव कोरलं आहे. तसेच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाच्या विभागात ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाने बाजी मारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये यंदाही मराठी चित्रपटांचा डंका पाहायला मिळत आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं. तसेच ‘गोदावरी’साठी निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये काश्मीर फाइल्ससाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी यांना जाहीर झाला आहे.

हेही वाचा : 69th National Film Awards : अल्लू अर्जुन ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, ‘या’ अभिनेत्रींनी मारली बाजी! पहिल्यांदाच कोरलं राष्ट्रीय पुरस्कारावर नाव

वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी –

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – सरदार उधम

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – एकदा काय झालं

सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी – आरआरआर (तेलुगू)

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – आरआरआर (तेलुगू)

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा १

सर्वोत्कृष्ट एडिटर – गंगूबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट संवाद लेखक – गंगूबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट गायिका – श्रेया घोषाल

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी), क्रिती सेनॉन (मीमी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – पुष्पा (अल्लू अर्जून)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी)

सर्वोत्कृष्ट चित्रपट- ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’

हेही वाचा : 69th National Film Awards : प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला ‘एकदा काय झालं’ ठरला उत्कृष्ट मराठी चित्रपट

दरम्यान, अभिनेत्री आलिया भट्ट, क्रिती सेनॉन आणि अभिनेता अल्लू अर्जुन या तिन्ही कलाकारांवर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. त्यांनी पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार नाव कोरलं आहे. राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली होती. त्यासाठी जानेवारी १९५३ ते डिसेंबर १९५३ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली होती. यावेळी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘शामची आई’ या मराठी चित्रपटाला देण्यात आला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 69th national film awards 2023 check the full list of winners sva 00
Show comments