69th National Film Awards Ceremony Updates in Marathi : ६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा १७ ऑक्टोबरला दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडला. चित्रपट आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा दरवर्षी भारत सरकारकडून गौरव केला जातो. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्ट आणि क्रिती सेनॉनने मिळून ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या पुरस्कारावर नाव कोरलं. दोघींचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार होता.

हेही वाचा : Video : नव्याकोऱ्या हॉटेलमध्ये कॉमेडीचा तडका! ‘एकदा येऊन तर बघा’चा दमदार टीझर प्रदर्शित, तब्बल १६ विनोदवीर खळखळून हसवणार

आलिया व क्रिती या भव्य सोहळ्याला साडी नेसून गेल्या होत्या. मात्र, आलिया भट्टच्या साडीने सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं कारण, अभिनेत्रीने तिच्या लग्नातील साडी नेसून या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. आलियाने तिच्या लग्नात सब्यसाचीने डिझाईन केलेली ऑफ व्हाइट रंगाची सुंदर साडी या पुरस्कार सोहळ्याला नेसली होती.

हेही वाचा : केदार शिंदेंच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस! ‘तो’ फोटो शेअर करत सनाला दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, “एकच लक्षात ठेव…”

आलिया भट्टने या साडीची निवड का केली यामागचं विशेष कारण सांगितलं आहे. “तुमच्या आयुष्यातील सुंदर क्षण साजरे करण्यासाठी तसाच छानसा पोशाख असावा अशी आपली इच्छा असते आणि कधीकधी तो पोशाख तुमच्याजवळ आधीच असतो. एखादा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी पुन्हा तेच कपडे वापरले तर काय हरकत आहे? पुन्हा नेसा (rewear ), पुन्हा वापरा (reuse ) आणि याची पुनरावृत्ती करा. (repeat)” असा खुलासा अभिनेत्रीने तिच्या इन्स्टग्राम पोस्टद्वारे केला आहे.

हेही वाचा : १९८९ च्या ‘हमाल दे धमाल’मधील कॅमिओसाठी अनिल कपूर यांनी किती मानधन घेतलं? जयंत वाडकरांनी केला खुलासा

alia bhatt
आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्ट प्रचंड सक्रिय असते. बॉलीवूडचे बहुतांश कलाकार एकदा वापरलेले कपडे, साड्या पुन्हा कधीच वापरत नाहीत. परंतु, आलियाने लग्नाची साडी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला पुन्हा एकदा नेसल्यामुळे अभिनेत्रीचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Story img Loader