बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी दोन चित्रपट प्रदर्शित झाले. पण या दोन्ही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे. पहिला चित्रपट म्हणजे टीझरपासून वादात अडकलेला ७२ हूरें होय, तर दुसरा विद्या बालनचा नीयत. या दोन्ही चित्रपटांना पहिल्या दिवशीच प्रेक्षक मिळत नव्हते, अशातच आता तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत, ते निराशाजनक आहेत.

पत्नी डॉक्टर असल्याचा फायदा झाला का? दत्तू मोरे म्हणाला “काहीही झालं तरी…”

Prasad Oak was on a liquid diet for 55 days for the film Dharmaveer
‘धर्मवीर’ चित्रपटासाठी प्रसाद ओक एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल ‘इतके’ दिवस होता लिक्वीड डाएटवर, यामागचं कारण जाणून घ्या…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
silver coins
विश्लेषण: इंग्लंडमध्ये सापडला आजवरचा सर्वांत मौल्यवान गुप्त खजिना…१००० वर्षांपूर्वीची २५०० चांदीची नाणी… किंमत अवघी ५६ लाख डॉलर!
Diwali Jugaad Video how to clean diya in Diwali 2024 kitchen tips in marathi
गॅसवर दिवा ठेवताच कमाल झाली; दिवाळीआधी पणतीचा ‘हा’ VIDEO जरूर पाहा, दिवाळीत होईल मोठा फायदा
stock market today sensex drops 663 point nifty ends below 24200
परकीयांच्या विक्रीने बाजार बेजार ! करोनानंतरचा सर्वात घातक महिना
cid
CID सहा वर्षांनी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, धमाकेदार टीझर प्रदर्शित; मालिकेत कोण कोण दिसणार?
Gold will cross the mark of 85 thousand in Diwali
दिवाळीत सोने ८५ हजारांचा टप्पा ओलांडणार! आजचे दर बघून ग्राहकांमध्ये…

पवन मल्होत्रा ​​आणि आमिर बशीर स्टारर ‘७२ हुरें’ला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादात सापडला होता. प्रेक्षकांनी ‘७२ हूरें’कडे पाठ फिरवल्याचं दिसतंय. याने पहिल्या दिवशी फक्त ३५ लाख रुपयांची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ४५ लाखांचा गल्ला जमवला, तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ४७ लाख रुपयांची कमाई केली. तीन दिवसांनी चित्रपटाची कमाई १.२६ कोटी झाली आहे.

आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”

दुसरीकडे, विद्या बालनचा ‘नीयत’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. अनु मेनन दिग्दर्शित हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री असून तो ७ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, ‘नियात’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी १.०२ कोटींचा व्यवसाय केला. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत थोडीशी वाढ झाली आणि रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी त्याने १.६२ कोटींचे कलेक्शन केले. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘नीयत’ ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी १.५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता ४.१९ कोटींवर गेली आहे.

आणखी वाचा : “इंग्रज कोकणस्थ ब्राह्मणांना आपली औलाद म्हणून सोडून गेले”, म्हणणाऱ्याला मराठी अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, “ही भाषा…”

‘७२ हूरें’ आणि ‘नीयत’ दोन्ही चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाही. या चित्रपटांचे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस रिपोर्ट खूपच निराशाजनक आहेत. हे दोन्ही चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ठरले. अशा परिस्थितीत वीकेंडनंतर आता या आठवड्यात ते थिएटर्समधून गाशा गुंडाळतील, अशी चिन्हे आहेत.