‘७२ हूरें’ चित्रपट टीझर आल्यापासून वादात अडकला होता. चित्रपट अप्रूव्ह करूनही सेन्सॉर बोर्डाने ट्रेलर रिजेक्ट केला होता, त्यानंतर निर्मात्यांनी नाराजी व्यक्त करत परवानगी नसतानाही ट्रेलर डिजिटल स्वरुपात रिलीज केला होता. याच संपूर्ण वादादरम्यान हा चित्रपट शुक्रवारी म्हणजेच ७ जुलै रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

’72 Hoorain’: चित्रपट अप्रूव्ह पण ट्रेलर रिजेक्ट, सेन्सॉर बोर्डावर संतापलेले निर्माते म्हणाले, “एका मृतदेहाचे…”

पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’चा जलवा! तीन आठवड्यात कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Movies Releasing on OTT in October
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चित्रपट OTT वर होत आहेत प्रदर्शित, वाचा यादी
Devara Box Office Collection Day 1
Devara चित्रपटाची जबरदस्त ओपनिंग, जान्हवी कपूर-ज्युनिअर एनटीआरच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले तब्बल…
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
National Film Day, Navra Maza Navsacha 2,
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा मुहूर्त फळला, ‘नवरा माझा नवसाचा २’सह सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल
Navra Maza Navsacha 2
‘नवरा माझा नवसाचा २’ ते ‘हे’ चित्रपट पाहता येणार फक्त ९९ रुपयांत, चित्रपटप्रेमींसाठी खास ऑफर; काय आहे निमित्त?
Radhika Apte Movies on OTT (1)
मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलीवूड चित्रपटांमध्ये केल्यात बोल्ड भूमिका, कुटुंबासह पाहता येणार नाहीत तिचे OTT वरील ‘हे’ सिनेमे

रिलीजपूर्वीच वादात सापडलेला ‘७२ हुरें’ हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला वादांचा फारसा फायदा झाला नाही. कारण पहिल्याच दिवशी चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळल्याचं चित्र आहे. चित्रपटाला प्रेक्षकच मिळत नसून त्याच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे अत्यंत निराशाजनक आहे.

३० दिवसांसाठी ‘ट्रायल पीरियड’वर मागवलेल्या बाबाची गोष्ट; जिनिलीया देशमुखच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबतच निर्माते अशोक पंडित यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. धमक्या येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास ‘७२ हुरें’ला प्रेक्षकच मिळत नाहीत. हा चित्रपट पाहण्यासाठी शुक्रवारी थिएटर्समध्ये फक्त ७ टक्के प्रेक्षक आले होते. चित्रपटाने पहिल्या दिवशी ५० लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. ही आकडेवारी खूपच कमी आहे.

पंतप्रधान मोदी व योगींना इस्लाम धर्म स्वीकारण्याचे निमंत्रण देणाऱ्या मौलवीवर जावेद अख्तर संतापले; म्हणाले, “या मूर्खाला…”

पहिल्या दिवसाची कमाई पाहता चित्रपट सिनेमागृहांमध्ये जास्त दिवस टिकण्याची शक्यता कमी आहे. पण, वीकेंडला ‘७२ हूरें’ ला प्रेक्षक मिळाल्यास कमाईच्या आकड्यात पहिल्या दिवसापेक्षा थोडी वाढ नक्कीच होऊ शकते. हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये टिकतो की गाशा गुंडाळतो, हे लवकरच कळेल.