‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’नंतर प्रदर्शित झालेला वादग्रस्त ’72 हूरें’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरन सिंह चौहान दिग्दर्शित या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. पहिल्याच दिवशी ’72 हूरें’नं अत्यंत निराशाजनक कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या गल्ल्यात थोडीशी वाढ झाली, पण त्यानंतर कमाईत उतरती कळा सुरू झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

’72 हूरें’ चित्रपटानं पहिल्या दिवशी ०.३५ कोटी, दुसऱ्या दिवशी ०.४५ कोटी, तिसऱ्या दिवशी ०.४५ कोटी, चौथ्या दिवशी ०.१७ कोटी आणि पाचव्या दिवशी फक्त ०.१८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं एकूण १.६ कोटींचा गल्ला जमवला आहे. अशोक पंडित निर्मित ’72 हूरें’ चित्रपट १० कोटींमध्ये बनवण्यात आला होता, पण तो अजून २ कोटींचा आकडाही पार करू शकला नाही.

हेही वाचा – “तुमच्याबरोबर काम करणं अभिमानास्पद”, शाहरुख खान दाक्षिणात्य सुपरस्टारच्या प्रेमात

हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाइटमध्ये आहे. ज्यामध्ये दोन दहशतवाद्यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. हे दोन दहशतवादी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे बॉम्बस्फोट करण्यासाठी पाठवलेले असतात. त्यांचं ब्रेनवॉश केलं गेलं असतं की, असा हल्ला करून त्यामध्ये मृत्युमुखी पडला तर जन्नतमध्ये ’72 हूरें’ मिळतात. चित्रपटातील याच मुद्द्यामुळे ट्रेलर चर्चेत आला होता.

हेही वाचा – टोमॅटोच्या वाढत्या दराचा परिणाम सुपरस्टारवरही; अभिनेता सुनील शेट्टी म्हणाला, “आता खाण्याबाबत….”

’72 हूरें’ पूर्वी ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’ची कहाणी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती, पण या वादाचा चित्रपटांना चांगलाच फायदा झाला होता. ‘द कश्मीर फाइल’नं ३०० कोटींहून अधिक कमाई केली; तर ‘द केरला स्टोरी’ चित्रपटानं २०० कोटींहून अधिक व्यवसाय केला होता. परंतु, ’72 हूरें’ला सपशेल अपयश आलं आहे.