‘द केरला स्टोरी’ चित्रपटानंतर दहशतवादावर आधारित ‘७२ हूरें’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. धर्मांतर, दहशतवाद या विषयांमुळे समाजातील कोणात्याही घटकाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने ‘७२ हूरें’ चित्रपटाचा ट्रेलर पास करण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र, असे असतानाही चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘७२ हूरें’ चा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित केला आहे.

हेही वाचा : करण जोहरने मागितली आलिया भट्टची माफी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “‘तुम क्या मिले’ गाण्याचे शूटिंग करताना…”

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: शत्रूचे सत्य समोर आणण्यासाठी तुळजाने केला प्लॅन; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?

‘७२ हूरें’ च्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला ‘हुरें’ म्हणजेच कुमारिका मुली असा अर्थ अतिरेक्यांना समजावून सांगितला जात आहे. आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोन दहशतवाद्यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षणादरम्यान ‘तुमच्या मृत्यूनंतर जन्नतमध्ये ७२ कुमारिका मुली तुमच्या सेवेत राहतील’ असे आश्वासन देऊन त्यांचा ब्रेनवॉश केला जातो असे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचे विदारक दृश्य ‘७२ हूरें’ च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. चित्रपटाची कथा सत्यघटनेवर आधारित असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. यापूर्वी रिलीज झालेल्या ‘७२ हूरें’च्या टीझरमध्ये ओसामा बिन लादेन, अजमल कसाब, याकूब मेमन, मसूद अझहर, हाफिज सईद आणि सादिक सईद यांसारख्या दहशतवाद्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता, तेव्हापासूनच हा चित्रपट वादात सापडला आहे.

हेही वाचा : “तुम क्या मिले…” अरिजित सिंहच्या आवाजाने जिंकली प्रेक्षकांची मनं; रणवीर-आलियाच्या ‘रॉकी और रानी…’मधील पहिलं गाणं रिलीज

संवेदनशील प्रेक्षकांच्या भावनांचा विचार करून सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) चित्रपटाचा ट्रेलरला पास करण्यास नकार दर्शवला आहे. यावर चित्रपटाचे सहनिर्माते अशोक पंडित यांनी सीबीएफसीच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रमाणपत्र नाकारण्याच्या निर्णयाची जबाबदारी सीबीएफसीच्या सर्व अधिकाऱ्यांची आहे.”, असे अशोक पंडित पत्रकार परिषदेत म्हणाले.

हेही वाचा : शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाचा टीझर लवकरच होणार प्रदर्शित; चेन्नईत संपन्न होणार भव्य सोहळा?

‘७२ हूरें’ चित्रपट ‘द केरला स्टोरी’सारखा सत्यघटनांवर आधारित असल्याचा दावा निर्मात्यांसह काही मीडिया रिपोर्ट्सनी केला आहे. ७२ कुमारिका मुलींचे खोटे आश्वासन देऊन तरुणांचे ब्रेनवॉश केले जाते. पुढे त्यांना सुसाइट बॉम्बर बनवले जाते, या सगळ्या घटनांचा मृत्यूनंतर उलगडा होऊन दहशवाद्यांना कसा पश्चाताप होतो हे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. चित्रपटात पवन मल्होत्रा, आमिर बशिर, राशिद नाज, अशोक पाठक हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. ‘७२ हूरें’ चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरण सिंह चौहान यांनी केले असून चित्रपट ७ जुलै २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे ट्रेलरमधून जाहीर करण्यात आले आहे.

Story img Loader