‘द केरला स्टोरी’नंतर आता आणखी एका चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. धर्मांतर, दहशतवाद आणि निष्पाप लोकांचे ब्रेनवॉशिंग या पार्श्वभूमीवर बनवण्यात आलेल्या ‘७२ हूरें’ चित्रपटाचा ट्रेलर पास करण्यास सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य या मुद्द्यांवर वाद सुरू झाला आहे. आता चित्रपटाचे निर्माते या निर्णयाविरोधात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे जाण्याच्या तयारीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुझा आणि करीना कपूरचा संबंध काय?” अभिनेत्रीचा ‘ढोबळी’ उल्लेख करत अवधूत गुप्ते म्हणाला, “ती माझ्या…”

सीबीएफसीच्या निर्णयावर चित्रपटाचे सहनिर्माते अशोक पंडित यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘एएनआय’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, “आम्ही एका मृतदेहाचे पाय दाखवले आहेत, ते सीबीएफसीने हटवण्यास सांगितले आहे. कुराणचा संदर्भ काढून टाकण्यास सांगितलं आहे. प्राणी कल्याणासाठी काही गोष्टी आहे, पण त्या महत्त्वाच्या नाहीत. हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट आहे. तुम्ही चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र जारी केले आहे. तेच सीन्स ट्रेलरमध्ये आहेत मग तुम्ही ट्रेलर कसा रिजेक्ट करू शकता? आम्ही ट्रेलर डिजिटल रिलीज करणार आहोत. आधी आम्ही तो पीव्हीआरमध्ये रिलीज करणार होतो, पण आता अंधेरीच्या क्लबमध्ये रिलीज करणार आहोत.”

कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत

सीबीएफसीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना अशोक पंडित म्हणाले, “तिथे बसलेले हे लोक कोण आहेत? ही अतिशय गंभीर बाब आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रमाणपत्र नाकारण्याच्या या निर्णयाची जबाबदारी सीबीएफसीच्या सर्व अधिकाऱ्यांवर आहे. या चित्रपटाला इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा विभागात पुरस्कारही मिळाला आहे. तुम्ही त्या चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र कसे नाकारू शकता? सेन्सॉर बोर्डात काहीतरी गडबड आहे आणि त्याला प्रसून जोशी जबाबदार आहेत.”

सीबीएफसीने चित्रपटाला आधीच मंजुरी दिली होती, पण आता ट्रेलर रिजेक्ट केला आहे. त्यामुळे हा निर्मात्यांसाठी एक मोठा धक्का आहे. हा ट्रेलर आज (२८ जून) रोजी प्रदर्शित केला जाणार होता. तसेच चित्रपट ७ जुलै रोजी प्रदर्शित होईल.