गेल्या काही वर्षात अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल बॉलिवूडमध्ये तयार करण्यात आले. यात ‘गोलमाल’, ‘सिंघन’, ‘धूम’ अशा सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. अशातच आता आणखी एका लोकप्रिय चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. हा चित्रपट म्हणजे आमिर खानचा ‘गजनी.’ मूळ तमिळमध्ये बनलेल्या ‘गजनी’ या चित्रपटात सुरिया, असिन आणि नयनतारा मुख्य भूमिकेत होते. तीन वर्षांनंतर, म्हणजेच २००८ मध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शक मुर्गदास यांनी या चित्रपटाचा हिंदी रिमेक केला. या हिंदी रिमेकमध्ये आमिर खान आणि असिनसह जिया खान हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : थिएटरनंतर ‘गुडबाय’ चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी सज्ज, ‘या’ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

शॉर्ट टर्म मेमरी लॉस या आजारावर बेतलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर लॉन्ग टर्म गारुड केलं होतं. खुद्द आमिर याच्या प्रमोशनसाठी रस्त्यावर उतरून लोकांना खास गजनी स्टाइल हेअर कट देत होता. तेव्हा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. तर, हा चित्रपट बॉलिवूडमधील १०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला होता.

आता जवळपास तीन वर्षांच्या ब्रेकनंतर ए.आर. मुर्गदास दिग्दर्शनाकडे परतत असून त्यासाठी त्यांनी ‘गजनी’ची निवड केल्याची चर्चा आहे. ‘बॉलीवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, एआर मुर्गदास ‘गजनी’ या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ‘गजनी २’ संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार असल्याचे समजते. म्हणजेच, ते हा चित्रपट एकाच वेळी तामिळ तसेच तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित करणार आहेत.

आणखी वाचा : आमिरच्या ‘गजनी’मुळे हॉलिवूडचा ‘हा’ दिग्दर्शक चांगलाच अस्वस्थ झाला होता; अनिल कपूरने सांगितला किस्सा

या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या सिक्वेलची कथा काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्याप्रमाणेच या चित्रपटात कोण कोण कलाकार झळकणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दक्षिणात्य अभिनेता सुरिया हा ए.आर. मुर्गदास यांचा नेहमीच आवडता अभिनेता राहिला आहे, तर आमिर खाननेही २००८ मध्ये या चित्रपटाच्या रिमेकमध्ये जीव ओतला होता. मुर्गदास हे दोन्ही चित्रपटांचे लेखक-दिग्दर्शक होते. या दोन्ही चित्रपटात असिन मुख्य भूमिकेत होती. तर जी भूमिका तमिळमध्ये नयनताराने केली होती, ती हिंदीमध्ये अभिनेत्री जिया खानने साकारली होती. त्यामुळे अशा परिस्थितीत या चित्रपटात कोणत्या कलाकारांच्या भूमिका असणार आणि हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्याची सर्वजण वाट पाहत आहेत.