आपल्या संगीताने आणि गायकिने जगभरातील संगीतप्रेमींना भुरळ घालणारे संगीतकार-गायक ए आर रेहमान यांच्या विविध भाषांमधील गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत यांचा मिलाप त्यांच्या गाण्यांमधून पाहायला मिळतो. त्यांनी ऑस्कर पुरस्कारवरही स्वतःचे नाव कोरले आहे. जगभरातील आघाडीच्या संगीतकारांमध्ये त्यांचं नाव सामील आहे.

रेहमान यांना मातृभाषेबद्दल असलेला अभिमान सगळ्यांनाच ठाऊक आहे. बऱ्याच ठिकाणी रेहमान हे हिंदी भाषेचा वापर करायचा टाळतात किंबहुना ते तुम्हाला हिंदीत बोलताना दिसणारच नाही, आता पुन्हा एका कार्यक्रमात रेहमान यांनी त्यांची पत्नी सायरा बानू हिला हिंदीत बोलण्यापासून रोखलं आहे.

Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
Eknath SHinde Ravi Rana
Eknath Shinde : महायुतीत बिनसलं? शिंदे, पवारांचा रवी राणांवर संताप; मुख्यमंत्री म्हणाले, “युतीत मिठाचा खडा…”
Sule indirectly attacked Ajit Pawar and his supporters during speech
“आजकाल भाषण करतांना काळजी घ्यावी लागते” सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?

आणखी वाचा : राखी सावंत ‘Z Security’साठी घेणार पंतप्रधान मोदींची भेट; अभिनेत्री म्हणाली, “जर कंगनाला सुरक्षा…”

नुकतंच रेहमान यांना विकटन सिनेमा अवॉर्ड’मध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी पुरस्कार स्वीकारताना रेहमान यांनी त्यांच्या पत्नीला मंचावर बोलावलं आणि पुरस्कार स्वीकारताना दोन शब्द बोलायचीही विनंती केली. मंचावर आल्याने तिने रेहमान यांना मिठी मारली. जशी रेहमान यांची पत्नी बोलायला सरसावली तेव्हा रेहमान तिला तमिळमध्ये म्हणाले, “कृपया तमिळमध्ये बोल, हिंदीमध्ये नाही.”

रेहमान यांचं हे म्हणणं ऐकून सायरा हसून म्हणाली, “मला माफ करा, मी तमिळमध्ये सराईतपणे बोलू शकत नाही. मी खूप आनंदी आहे कारण रहमानचा आवाज माझा सर्वात आवडता आवाज आहे. मी त्याच्या या सुरेल आवाजाच्या प्रेमात पडले आहे मी एवढंच सांगू शकते.” आज एवढ्या वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करूनही रेहमान यांना त्यांच्या भाषेबद्दल असलेला अभिमान यातून स्पष्टपणे दिसतो. रेहमान आणि सायरा यांनी १९९५ मध्ये लग्नगाठ बांधली.