Aadar Jain And Alekha Advani Roka Ceremony : कपूर कुटुंबीयांच्या घरात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री करीना कपूरचा आतेभाऊ आदर जैन याचा रोका नुकताच पार पडला. आता लवकरच अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे. आदर हा रीमा कपूर व मनोज जैन यांचा मुलगा आहे. हा करीना, करिश्मा व रणबीरचा आतेभाऊ लागतो. त्यामुळे आपल्या भावाच्या रोका सेरेमनीसाठी शनिवारी सगळे कपूर कुटुंबीय एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

आदर ( Aadar Jain ) याने साधारण २ महिन्यांपूर्वी आपल्या होणाऱ्या पत्नीला एकदम फिल्मी स्टाइलमध्ये प्रपोज केलं होतं. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. समुद्रकिनारी गुडघ्यावर बसून आदरने आपल्या गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घातली होती. या जोडप्याच्या फोटोंमध्ये मोठ्या अक्षरात पाठीमागे ‘Marry Me’ लिहिल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर आता या दोघांचा रोका पार पडला आहे.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम सायलीचं शिक्षण माहितीये का? मिळवलंय Gold Medal; उच्चशिक्षित जुई अभिनयाकडे कशी वळली?

आदर जैनच्या होणाऱ्या पत्नीचं नाव अलेखा अडवाणी असं आहे. या दोघांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी करीना कपूर, करिश्मा कपूर, बबिता, आदरचा भाऊ अरमान जैन, रणधीर कपूर, रणबीर कपूर असे सगळे कपूर कुटुंबीय एकत्र आले होते. रोका सेरेमनी पार पडल्यावर आदर आणि अलेखा यांनी पापाराझींसमोर येऊन सर्वांची विचारपूस केली. यावेळी या दोघांनी Twinning केल्याचं पाहायला मिळालं.

आदर जैनची होणारी पत्नी आहे तरी कोण?

आदर जैन ( Aadar Jain ) २०२० ते २०२३ या काळात बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर या दोघांचं ब्रेकअप झालं. आता आदरने आपल्या बालमैत्रिणीला लाइफ पार्टनर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. अलेखा अडवाणी ही सिनेविश्वापासून दूर आहे. तिचं शिक्षण न्यूयॉर्कमध्ये पूर्ण झालं असून ती मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय आहे. तारा आणि अलेखा सुद्धा एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.

हेही वाचा : “सासू-सून महायुती…”, नवीन लग्न झालेल्या पृथ्वीक प्रतापला घासावी लागली भांडी! मजेशीर व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

दरम्यान, आदर जैनच्या ( Aadar Jain ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्याने २०१७ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर तो शेवटचा हॅलो चार्ली चित्रपटात झळकला होता. हा सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता आदर अलेखाबरोबर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

Story img Loader