सोशल मीडियामुळे सेलिब्रिटीज आणि त्यांचे चाहते यांच्यातील अंतर कमी झालं आहे. कधी कधी या गोष्टीचा गैरफायदादेखील काही मंडळी घेतात. बऱ्याचदा ही गोष्ट अभिनेत्रींच्या बाबतीत घडते, सार्वजनिक ठिकाणी आपल्या लाडक्या सेलिब्रिटीला पाहून काही चाहते भान विसरून जातात, अन् त्यांच्या हातून काहीतरी चुकीची कृती घडते. हा प्रकार नुकताच अभिनेत्री आहाना कुमराच्या बाबतीत घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने आयोजित केलेल्या एका इवेंटला गेली असताना आहानापाशी तिच्या बऱ्याच चाहत्यांनी घोळका केला. तिनेही अगदी हसत खेळत प्रत्येक चाहत्याबरोबर फोटो काढला, त्यापैकीच एक चाहता तिच्यापाशी जेव्हा फोटो काढायला आला तेव्हा त्याने परवानगी न घेता आहानाच्या हाताला स्पर्श केला. हे पाहून आहाना चांगलीच उखडली, “कृपया मला हात लावू नका” असं म्हणत ती तिथून चिडून निघून गेली. सोशल मिडियावर तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.

आणखी वाचा : “आपल्या लोकांना जागरूक…” बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांचं ‘द केरला स्टोरी’बद्दल मोठं वक्तव्य

याबद्दल आहानाने नंतर लगेच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत तिची खंत व्यक्त केली. नुकतंच आहानाने याबद्दल ‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना खुलासा केला आहे. या मुलाखतीमध्ये त्यावेळी आहानाला नेमकं काय वाटलं आणि यासाठी काय काळजी घ्यायला हवी याबद्दल भाष्य केलं आहे. आहाना म्हणाली, “मी फोटो काढण्यासाठी होकार दिला होता याचा अर्थ तुम्ही मला हात लावू शकता असं होत नाही. तो फारच विचित्र अनुभव होता. जेव्हा माझी इच्छा नसते तेव्हा मी अत्यंत नम्रपणे फोटो काढण्यास नकार देते, पण सहसा मी कधीच कुणाशी इतकं वाईट वागत नाही.”

पुढे ती म्हणाली, “सेलिब्रिटी असल्याने लोक पटकन आम्हाला ग्राह्य धरतात, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सतत त्यांच्यासमोर येत असतो. कधीकधी सेलिब्रिटी आणि चाहत्यामध्ये असलेली पुसटशी रेषा लोक ओलंडतात. आम्ही त्यांना तितकं ओळखत नसतो, त्यामुळे लोकांनी योग्य अंतर ठेवणं कधीही योग्यच. जेव्हा आम्हाला अशा कार्यक्रमात बोलावलं जातं तेव्हा आमच्या सुरक्षेचा विचार आयोजकांनी करायला हवा.” ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटातून आहानाला ओळख मिळाली. चित्रपटांबरोबरच ती वेब विश्वातही चांगलीच सक्रिय आहे.