शाहरुख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटातून एखाद्या सुपरस्टारचा चाहता नेमका कोणत्या थराला जाऊ शकतो हे आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. अगदी असाच नव्हे पण काहीसा याच पठडीतला शाहरुखचा एक चाहता सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. आकाश नावाच्या शाहरुखच्या चाहत्याची तब्बल ३३ दिवसांच्या मेहनतीला फळ आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खुद्द शाहरुखनेच त्याला घरी बोलावून त्याचा पाहुणचार केल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आकाश पिल्लई हा शाहरुखला भेटण्याचा प्रयत्न करत होता. शाहरुख सध्या ‘जवान’च्या निमित्त ठिकाठिकाणी फिरत असला तरी त्याच्या मागेमागे आकाश एक बोर्ड घेऊन उभा राहायचा ज्यावर लिहिलेलं असायचं “15 days of waiting SRK”. या बोर्डवरील फक्त दिवसांची संख्या बदलायची पण आकाशचा आत्मविश्वास कधीच डगमगला नाही.

आणखी वाचा : ए.आर रेहमान पुन्हा चर्चेत, सर्जन्‍स एसोस‍िएशनवर संगीत दिग्दर्शकाचा मानहानीचा आरोप; केली १० कोटींची मागणी

आकाश कायम शाहरुखचा बंगला ‘मन्नत’बाहेर बोर्ड घेऊन उभा असायचा. शाहरुख जिथे जिथे जाईल तिथे तिथे आकाश त्या बोर्डसह पोहोचायचा. अशाप्रकारे ३३ दिवस ताटकळत वाट पाहिल्यावर अखेर शाहरुखने अक्षयला त्याच्या घरीच बोलावले. ही सगळी कहाणी अक्षय त्याच्या इंस्टाग्रामच्या रील्सच्या माध्यमातून शेयर करायचा. नुकतंच शाहरुखला भेटल्याचंही त्याने अशा रीलमधून शेअर केलं.

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचेही आकाशने आभार मानले. शाहरुख हा फार चांगला माणूस असल्याचंही आकाशने या रीलमध्ये सांगितलं. अशा रीतीने अखेर एका चाहत्याचं शाहरुख खानला भेटायचं स्वप्न पूर्ण झालं. याआधीही एका मॉडेलला शाहरुखने आपल्या घरी बनवून तिला स्वतःच्या हातचा पिझ्झा खाऊ घातल्याची चर्चा झाली होती. एकूणच शाहरुख हा त्याच्या चाहत्यांवरही तितकंच प्रेम करतो हे या अशा काही उदहरणांवरुन स्पष्ट होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aakash pillay struggle of 32 days to meet shahrukh khan king khan calls him in mannat avn
Show comments