नवाजुद्दीन सिद्दिकी सध्या त्याच्या आगामी ‘जोगिरा या कॉमेडी-ड्रामा चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात नवाजच्या विरुद्ध अभिनेत्री नेहा शर्मा दिसणार आहे. चित्रपटांव्यतिरिक्त नवाजुद्दीन पत्नीबरोबरच्या खराब संबंधांमुळे वादात सापडला होता. नवाजच्या पत्नीने नवाजवर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच नवाज आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हाही दाखल केला होता.
नवाजनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली बाजू मांडत आलियावर आरोप केले होते. दोघांमधला वाद एवढा विकोपाला गेला होता की प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले होते. मात्र, आता नवाजची पत्नी आलियाने नवाजला पत्र लिहीत तिच्या चुकांची माफी मागितली आहे. आलियाचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
हेही वाचा– मंचावर येत मिठी मारली अन्…, ब्रेकअपनंतर २२ वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र दिसले अक्षय कुमार-रवीना टंडन
इन्स्टाग्रामवर एक पत्र पोस्ट करीत आलिया सिद्दिकीने लिहिले, ‘नमस्कार नवाज… नवाज, हे पत्र तुझ्यासाठी आहे. आयुष्य हे पुढे जाण्याचे नाव आहे, असे मी अनेक ठिकाणी ऐकले आणि वाचले आहे. गेल्या काही महिन्यांत आपल्या दोघांमध्ये जे काही घडले, त्या सर्व गोष्टी विसरून मी माझ्या देवावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करेन, त्याच्या प्रेरणेने माझ्या चुकांची माफी मागेन, तुमच्या चुका माफ करेन आणि भविष्याला चांगला आकार देण्यासाठी पुढे जाईन. भूतकाळात अडकणे हे दुष्टचक्रात अडकण्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे भूतकाळ मागे टाकून, अशा चुका पुन्हा न करण्याची शपथ घेऊन मुलांचे भविष्य सोनेरी प्रकाशाने भरण्याची शपथ घेतो.”, असे आलियाने पत्रात लिहिलं आहे.
आलियाने तिच्या पत्रात पुढे लिहिले की, ‘तुम्ही खूप चांगले वडील आहात आणि आशा आहे की तुम्ही भविष्यात तुमची सर्व कर्तव्ये चोखपणे पार पाडाल. मुलांना चांगले भविष्य देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. माझी सगळी लढाई फक्त आपल्या मुलांसाठी होती. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून माझी काळजी मिटली. नवाज, आपण बराच काळ एकत्र घालवला आहे, आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत आणि सर्व परिस्थितीत जिंकलो आहोत. त्यामुळे मला आशा आहे की तू सध्या तुझ्या करिअरला मोठ्या उंचीवर नेशील. मी ते सर्व खटले मागे घेत आहे.
मला तुझ्याकडून आर्थिक मदतीची गरज नाही आणि मला तुझ्याकडून काही अपेक्षाही नाही. चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान घेतलेले कर्ज मला माझ्या मालकीचे घर विकून फेडायचे आहे.” आलिया पुढे लिहिते की, ”माझ्या कृतीमुळे मला चांगले भविष्य निश्चित करण्यास मदत होईल. आपण चांगले नवरा-बायको बनू शकलो नाही पण एक चांगले पालक बनू अशी आशा आहे.”