बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी आता ‘बिग बॉस OTT 2’ च्या घरातून बाहेर पडली आहे. घरातून बाहेर पडताच आलियाने अनेकांवर राग काढला. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणौतने नवाजुद्दीन आणि आलियाच्या वादामध्ये नवाजला पाठिंबा दिला होता. त्यावरुन आता आलियाने कंगनावर जोरदार टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- कार्तिक-कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

आलियाने बंगल्याच्या गेटबाहेर उभ्या असलेल्या नवाजबरोबर बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. या व्हिडिओबाबत कंगनाने म्हटले होते की, ‘जेव्हा त्याची स्वतःची पत्नी नवाजसारख्या मोठ्या स्टारचा अशा प्रकारे अपमान करत असते. तेव्हा हे सर्व पाहून मला रडू आले होते. आता आलियाने कंगनाच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा-‘पीके’ फेम अभिनेत्रीचं दुसरं लग्न मोडलं, १३ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय; म्हणाली…

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आलियाने ‘बॉलीवूड बबल’ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत कंगनाबद्दल बोलताना आलिया म्हणाली, “मी कंगनाकडे लक्ष देत नाही कारण तिच्या बोलण्यात काही अर्थ नाही. ती माझ्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसते. ती फक्त चुकीच्या गोष्टींवरच आवाज उठवण्यासाठी ओळखली जाते आणि प्रत्येकाबद्दल काही ना काही बोलत राहते.”

हेही वाचा-विजय वर्माने लाडाने तमन्नाला दिलं टोपण नाव; पोस्ट शेअर करत म्हणाला…

आलियाबरोबरच्या वादानंतर नवाजने सोशल मीडियावर एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर कंगनाने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. ज्यावर कंगनाने लिहिले होते “याची खूप गरज होती ‘सिद्दीकी साहब. गप्प राहणे नेहमीच मनाला शांती देत नाही. मला आनंद आहे की तुम्ही ही गोष्ट आमलात आणली”.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaliya siddiqui criticize kangana ranaut for supporting nawazuddin siddiqui dpj