नवाजुद्दिन सिद्दिकीची पत्नी आलिया सिद्दिकी अलीकडेच ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दिन आणि आलिया वैयक्तिक मतभेदांमुळे चांगलेच चर्चेत होते. नवाजुद्दिनवर अनेक आरोप केल्यानंतर आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर आलियाने अभिनेत्याच्या नव्या म्युझिकल व्हिडीओवर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : गोड प्रेमकहाणीत थरारक ट्विस्ट, वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या ‘बवाल’ चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

नवाजुद्दिन सिद्दिकी आणि शहनाझ गिल यांचे “यार का सताया हुआ है” हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नवाज-शहनाझच्या गाण्याबाबत नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असताना आता या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ आलिया सिद्दिकीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आलिया सिद्दिकीने या डान्सच्या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आलिया लिहिते, “या सुंदर गाण्यासाठी नवाजला खूप खूप प्रेम…या गाण्यावर डान्स करण्यापासून मी स्वत:ला रोखू शकले नाही.” तिचे हे कॅप्शन वाचून नेटकऱ्यांनी आलिया सिद्दिकीला चांगलेच ट्रोल केले आहे.

हेही वाचा : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये शाहरुख खान दिसणार खास भूमिकेत? चाहत्याला उत्तर देत करण जोहर म्हणाला, “३ कॅमिओ…”

एका युजरने आलिया सिद्दिकीला कमेंटमध्ये “तुला फॉलो करणं खूप कठीण आहे, कारण काही दिवसांपूर्वी नवाज तुझ्यासाठी वाईट माणूस होता आणि आता काही आठवड्यांनंतर तुला तो आवडतोय, प्रेमाची पोस्ट केलीस? काय सुरु आहे नक्की?” या युजरला आलियाने “मी माझा भुतकाळ विसरून नवी सुरुवात करत आहे.” असे उत्तर दिले आहे. तसेच दुसऱ्या एका युजरने “आता हे करून काही फायदा आहे, तुला त्याच्याकडे परत जायचेय का? त्याच्यावर किती आरोप केलेस?” असा सवाल तिला कमेंटमध्ये केला आहे.

हेही वाचा : लेक ईशाच्या जन्मावेळी धर्मेंद्र यांनी का बुक केलं होतं पूर्ण हॉस्पिटल? जाणून घ्या

दरम्यान, आलिया सिद्दिकी अलीकडेच बिग बॉसमधून बाद झाली. शोमध्ये तिने सायरस ब्रोचासमोर एकदा नवाजुद्दिनच्या आणि तिच्या नात्याबद्दल खुलासा केला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaliya siddiqui shares dance video on nawazuddin siddiqui song netizens troll actors wife sva 00