Aamir Khan advice to Junaid Khan : बॉलीवूडचे कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांचा चित्रपट, कधी त्यांचा अभिनय, तर कधी त्यांचे वक्तव्य यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. काही दिवसांपासून अभिनेता जुनैद खान ( Junaid Khan ) हा सतत चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. जेव्हा त्याने त्याच्या वडिलांना म्हणजेच आमिर खान (Aamir Khan) ला चित्रपटसृष्टीत येण्याबद्दल सांगितले होते तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली होती, सल्ला दिला होता याचा खुलासा जुनैदने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.

काय म्हणाला होता आमिर खान?

एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जुनैदने याबद्दल सांगितले आहे. ‘महाराज’फेम अभिनेता जुनैद खान हा बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा आहे. जेव्हा जुनैदने आपल्या करिअरची निवड केली आणि वडिलांना सांगितले की, मला अभिनय क्षेत्रात यायचे आहे. त्यावेळी आमिर खानने आपल्या मुलाला जुनैद खानला असा सल्ला दिला होता की, “तुला अभिनय करायचा आहे, तर तो शिकशील; त्यात अवघड काही नाही. मात्र, जर तुला भारतात काम करायचे असेल, तर तू इथल्या परंपरांकडे दुर्लक्ष करू नको. भारताची संस्कृती तुला माहीत असायला हवी. तुझा भारताच्या परंपरा-संस्कृतीशी परिचय असायला हवा.”

जुनैद खान नुकताच ‘महाराज’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जुनैद खान ‘करसन’च्या भूमिकेत दिसला आहे. त्याबरोबरच शालिनी पांडे, शर्वरी वाघ, समीर परांजपे हे कलाकारदेखील अभिनय करताना दिसले होते. जुनैद खानच्या अभिनयाबद्दल बोलायचे, तर महाराज हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे; पण त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा त्याला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : किरण माने यांची पोस्ट चर्चेत, “ब्राह्मण्यवादी व्यवस्थेनं बहुजनांना ‘पाप पुण्या’ची भीती दाखवून…”

दरम्यान, याआधी एका मुलाखतीत जुनैद खान या चित्रपटाऐवजी दुसऱ्या चित्रपटातून भेटीला येणार होता, याबद्दल त्याने सांगितले होते. त्याने म्हटले होते की, मी ‘महाराज’ चित्रपटातून नाही तर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. मात्र, त्याच्या वडिलांना म्हणजेच आमिर खानला तो चित्रपट करायचा होता. आमिरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखविण्यात अयशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले होते. ‘महाराज’ चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रा यांनी सांगितले की, ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये आमिर खानने जी भूमिका साकारली आहे, त्याच भूमिकेसाठी जुनैदने ऑडिशन दिले होते. पण, गमतीचा भाग असा आहे की, त्याच ऑडिशनमुळे जुनैदची ‘महाराज’ चित्रपटासाठी निवड झाली. ती ऑडिशन मी आणि आदित्य चोप्राने पाहिली होती. जुनैदने त्यामध्ये कमालीचा अभिनय करीत आपण उत्तम अभिनेता असल्याचे सिद्ध केले होते. आता ‘महाराज’नंतर तो कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader