‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून आमिर खानने जबरदस्त कमबॅक करायचा प्रयत्न केला, पण या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचा चांगलाच फटका बसला. प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे सपशेल पाठ फिरवली अन् तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आमिरच्या कारकीर्दीतील हा आजवरचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. यानंतर आमिर खानने अभिनयातून काही काळ ब्रेक घ्यायचं ठरवलं, तेव्हापासूनच आमिर लाईमलाइटपासून दूर झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सई ताम्हणकरचं क्रिती सेनॉनबरोबर खास सेलिब्रेशन, म्हणाली, “माझी…”

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, आता आमिर लवरकरच कमबॅक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आमिर चित्रपट निर्माता दिनेश विजान यांच्या एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती दिनेश विजान करत आहेत. या बायोपिकमध्ये आमिर खान काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उज्वल निकम यांनी १९९३ बॉम्बस्फोट प्रकरण, गुलशन कुमार हत्या, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, २६- ११ दहशतवादी हल्ला, शक्तीमिल बलात्कार प्रकरण, कोपर्डी बलात्कार अशा अनेक विविध प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.

हेही वाचा- पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान रिलेशनशिपमध्ये? दोघांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी आमिरने पंजाबी चित्रपट ‘कॅरी ऑन जट्टा ३’च्या ट्रेलर लॉंच सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळेस त्याने चित्रपटात कमबॅक करण्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. आमिर म्हणालेला, “मी अद्याप कोणताही चित्रपट स्वीकारलेला नाही. मला सध्या फक्त माझ्या कुटुंबासमवेत वेळ घालवायचा आहे आणि मी तेच करत आहे. जेव्हा चित्रपट करायची माझी मानसिक तयारी असेल तेव्हा मी नक्कीच काम करायला सुरुवात करेन.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan and dinesh vijan in talks to team up on ujjwal nikam biopic dpj