बॉलीवूड अभिनेता आमिर खान हा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून आमिर खान हा चित्रपटांसह त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आमिर हा लवकरच तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आमिर हा अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे आमिर लवकरच फातिमासोबत लग्न करणार असल्याचंही बोललं जात आहे. अशातच आमिर आणि फातिमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’वरून सुरू असलेल्या वादावरुन कंगना रनौत भडकली: म्हणाली, “असे चित्रपट…”

व्हिडीओमध्ये आमिर आणि फतिमा पिकबॉल खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ मुंबई येथील असून योगेश शाह यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. यामध्ये ते दोघे एकत्र दिसल्यामुळे चर्चांना परत उधाण आलं असून ते एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

हा व्हिडीओ पाहून नेटकरीही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं, “ही तर तिसऱ्या मम्मीची तयारी तर दुसऱ्या युजरने आमिर आता तिसरी बायको आणणार, अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने कमेंटमध्ये थोड्याच दिवसांत अधिकृत लग्न होणार असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा- “त्याला माझे अंतर्वस्त्र पाहायचे होते, कारण…” प्रियांका चोप्राने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली “मी संपूर्ण कपडे…”

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण रावने जवळपास १५ वर्षं एकत्र संसार केला. मात्र गेल्या वर्षी दोघांनीही सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत आपण घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली होती. त्यांची ही पोस्ट पाहून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. किरण ही आमिरची दुसरी पत्नी होती. किरणच्या आधी आमिरने रीना दत्ताशी लग्न केलं होतं. १६ वर्षांनंतर आमिर आणि रीना २००२ मध्ये विभक्त झाले. २००५ मध्ये किरण आणि आमिरने लग्न केलं. पण त्याचं हे लग्नही फार काळ टिकलं नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan and fatima sana shaikh playing pickball video viral dpj