आमिर खानची मुलगी आयरा खानचं नुपूर शिखरेशी लग्न झालं, या जवळपास १० दिवस चाललेल्या लग्नसोहळ्यानंतर आता आमिर दुसऱ्या पत्नीबरोबर रोड ट्रीपवर गेला आहे. अभिनेता आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी आणि दिग्दर्शक-निर्माती किरण राव हिने अलीकडेच इन्स्टाग्रामवर आपलं अकाउंट उघडलं आहे. इन्स्टाग्राम अकाउंटचं नाव तिने ‘राओडीनेस’ असं ठेवलं आहे. यात ती तिच्या आयुष्यातील फिल्टर नसलेल्या गोष्टी शेअर करताना दिसतेय. रविवारी (२१ जानेवारी) तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा एक्स पती आणि अभिनेता आमिर खान आणि त्यांचा मुलगा आझाद खान यांच्यासह रोड ट्रिपला जातानाचे फोटो शेअर केले.

किरणने निसर्ग सौंदर्य टिपत तिचा मुलगा आझाद याचे फोटो आणि एक कौटुंबिक फोटो शेअर केला आहे. “रोड ट्रिपिंग विथ सुंदरी” असे कॅप्शन देत त्यांनी त्यांच्या श्वानाबरोबरचे पोज दिलेले फोटो शेअर केले. त्यात तिघेही रोड ट्रिपमध्ये खूप आनंदी दिसत आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

या ट्रिपसाठी तिघेही कंफर्टेबल आणि स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत . फोटोमध्ये, किरण फिकट तपकिरी (बेज) रंगाचा टर्टलनेक स्वेटर आणि कार्गो पँटमध्ये दिसली तर आमिरनं फर जॅकेट आणि जीन्सची निवड केली आहे. यात त्यांचा मुलगा आझादने निळ्या रंगाचं टी-शर्ट आणि पँट घातली आहे, असं दिसतंय.

अलीकडेच किरण राव पतीच्या पहिल्या पत्नीची मुलगी आयरा खान आणि जिम ट्रेनर नुपूर शिखरेच्या लग्नात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. या समारंभाचे फोटो तिने तिच्या नव्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. आमिर खान आणि किरण राव त्यांच्या १५ वर्षाच्या संसारानंतर २०२१ मध्ये वेगळे झाले. परंतु ते त्यांचा मुलगा आझाद याचे सहपालक आहेत आणि त्यांच्या व्यावसायिक जीवनात ते एकत्र कामही करत आहेत.

त्यांच्या कामाबाबत बोलायचं झालं तर किरण राव ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची दिग्दर्शिका आहे. चित्रपटाचा ट्रेलर २४ जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. ‘पिंकविला’च्या अहवालानुसार, किरण रावचा दिग्दर्शक म्हणून कमबॅक असलेला ‘लापता लेडीज’ हा चित्रपट यावर्षी मार्चमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे. ‘लापता लेडीज’ हा विनोदी चित्रपट २०२३ मध्ये टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (TIFF) प्रदर्शित करण्यात आला आणि त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं होतं.

हा चित्रपट २००१ मधील ग्रामीण भारतातील परिस्थितीवर आधारित आहे आणि यात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आमिर खान प्रॉडक्शन आणि किंडलिंग प्रॉडक्शनची सह-निर्मिती असलेला हा चित्रपट ‘लापता लेडीज’ नावाच्या बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट १ मार्च २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader