बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. लवकरच आमिरची लाडकी लेक आयरा लग्नबंधनात अडकणार आहे. आयरा मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. आमिरच्या घरात सध्या लेकीच्या लग्नाची लगबघ सुरु आहे. त्यातच आता आमिरच्या घराचा घराचा व्हिडीओ समोर आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आयरा व नूपरच्या लग्नाची चर्चा सुरु होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये आयरा व नुपूरने गुपचूप साखरपुडा उरकत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या साखरपुड्यानंतर दोघांच्या लग्नाच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. उद्या म्हणजेच ३ जानेवारीला आयरा व नुपूर लग्नबंधनात अडकणार आहेत. वांद्रे येथील ताज लँड अँड हॉटेलमध्ये दोघांच्या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Farhan Akhtar Shibani Dandekar pregnancy
फरहान अख्तर ५१ व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा होणार? मराठमोळी सून गरोदर असल्याच्या चर्चांवर सावत्र सासूबाई शबाना आझमी म्हणाल्या…
BDD chawl redevelopment, houses Worli ,
बीडीडी चाळ पुनर्विकास : वरळीतील ५५० घरांचा ताबा मार्चमध्ये, म्हाडाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात घरांच्या वितरणाचा समावेश
Tuljabhavani Devi procession of goddess carried out on tiger vehicle
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा

हेही वाचा- पंकज त्रिपाठींच्या ‘मैं अटल हूं’ चित्रपटात सोनिया गांधींची भूमिका कोण साकारणार? अभिनेत्रीचं मराठी सिनेसृष्टीशी आहे खास कनेक्शन

लेकीच्या लग्नानिमित्त आमिर खानच्या घरी जय्यत तयारी करण्यात आली आहे. लग्नाअगोदर मुंबईतील आमिर खानच्या घराची सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण रोषनाईने आमिरचे घर उजळून निघाले आहे. आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी व आयराची आई रीना दत्ताच्या घरीही सजावट करण्यात आली आहे. या सजावटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने आयरा व नुपूरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नानंतर ६ ते १० जानेवारी दरम्यान दिल्लीत व जयपूरमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. आमिरने स्वतः बी-टाऊनमधील कलाकारांना आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नाचे आमंत्रण दिले आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. आयरा अनेकदा आपल्या सोशल मीडियावर नुपूरबरोबरचे फोटो शेअर करत असते. नुपूर एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर असून अनेक सेलिब्रिटी मंडळींना तो फिटनेस ट्रेनिंग देतो. इटलीमध्ये झालेल्या ‘आयर्न मॅन, इटली’ स्पर्धेमध्येही तो सहभागी झाला होता. याच स्पर्धेदरम्यान त्याने सगळ्यांसमोर आयराला प्रपोज केले होते.

Story img Loader