अभिनेता आमिर खानने आजवर अनेक आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. त्याने अक्षय कुमारची पत्नी आणि राजेश खन्ना यांची लेक ट्विंकलबरोबर एक चित्रपट केला होता. या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात आमिर खान आणि ट्विंकल खन्ना एकत्र ‘मेला’ चित्रपटाच्या शूटिंगचे किस्से सांगताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये करण जोहर त्यांना प्रश्न विचारत असून, दोघेही मजेशीर उत्तर देत आहेत. आमिर आणि ट्विंकल एकमेकांना चिडवताना दिसत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आमिर खान आणि ट्विंकल खन्नाच्या मजेशीर संवादाचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकलने सेटवर आमिरला रडताना पकडल्याचा एक किस्सा सांगितला, तर ट्विंकल अपमान करण्यात तरबेज असल्याचं आमिर मजेशीरपणे म्हणाला.
हेही वाचा…‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारच्या घरात आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने ठरवलं होतं होणाऱ्या बाळाचं नाव
“आमिर माझ्या कानाखाली मारणार होता!”
या व्हिडीओमध्ये करणने आमिरला विचारले, “तुला कधी वाटलं की ट्विंकल चांगली अभिनेत्री होती?” यावर आमिर थोडा गोंधळला. ट्विंकल खुलासा करत म्हणाली, “एकदा त्याने मला विचारले, ‘काय झालं? कामात लक्ष का नाहीये?’ तेव्हा मी त्याला सांगितलं की मी अक्षयबद्दल विचार करत होते. हे ऐकून आमिर माझ्या कानाखाली मारणार होता!” हे ऐकून आश्चर्यचकित झालेला आमिर म्हणाला, “खरंच? मला नाही वाटत मी असं काही केलं असतं.”
करणने पुन्हा विचारलेला प्रश्न आणि ट्विंकलचे मजेशीर उत्तर
करणने पुन्हा आमिरला ट्विंकलच्या अभिनयाबद्दल विचारले. त्यावर ट्विंकल हसून म्हणाली, “त्याला इतक्या वेळा विचारू नकोस. मी अभिनय करू शकत नव्हते आणि मला खूप आनंद आहे की मी अभिनय सोडला.”
आमिरने ट्विंकलमधील गुणांची प्रशंसा केली
आमिर या व्हिडीओमध्ये ट्विंकलबद्दल मजेशीरपणे प्रतिक्रिया देताना म्हणतो, “आपल्या सर्वांकडे वेगवेगळे गुण असतात. तसाच एक गुण ट्विंकलमध्येही आहे. ती लोकांचा अपमान करण्यात तरबेज आहे. माझ्या आयुष्यात नेहमीच तिने मला वेगवेगळ्या प्रकारे चिडवले आहे.”
आमिरला रडताना पाहिलेला किस्सा
ट्विंकलने या व्हिडीओमध्ये एक खास किस्सा शेअर केला. तिने सांगितले की ‘मेला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिने आमिरला एका मोठ्या खडकामागे रडताना पाहिलं होतं. ती म्हणाली, “आमिर दिग्दर्शक धर्मेश दर्शनकडे आपल्या शॉटबद्दल काहीतरी सांगायला गेला होता, पण त्यांनी त्याचं ऐकलं नाही. आमिर कामाबाबत खूप गंभीर असल्याने त्याला तेव्हा खूप वाईट वाटले आणि तो खडकामागे जाऊन रडायला लागला.”
हेही वाचा…‘लापता लेडीज’ ऑस्करला गेल्यावर मराठमोळ्या छाया कदम म्हणाल्या, “मी आनंदी, पण…”
आमिरने ट्विंकलचे कौतुक केले
आमिर म्हणाला, “खरं सांगायचं झालं तर ट्विंकलबरोबर काम करताना खूप मजा आली. तिची बुद्धिमत्ता आणि विनोदबुद्धी खूप कमाल आहे. तिला माणसांच्या वागणुकीची आणि नातेसंबंधांची खूप चांगली पारख आहे.”